मुंबई, 10 जून : कोरोना व्हायरसमुळे सध्या देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. ज्यामुळे देशभरात सर्वच व्यवसायिकांना मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. मात्र या सर्वात सध्या देशातील सर्वात जुना बिस्किट ब्रँड पार्ले-जी खूप चर्चेत आला आहे. याच कारण आहे लॉकडाऊनच्या दरम्यान या बिस्किटनं केलेली रेकॉर्ड ब्रेक कमाई. पार्ले जी ने लॉकडाऊनमध्ये विक्रीच्या बाबतीत 82 वर्षं जुनं रेकॉर्ड तोडलं आहे. यामुळे ही कंपना सध्या चर्चेत आहे. अशात बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डानं पार्ले-जी कंपनीला ट्विटरवरून खास अपील केलं आहे. त्याचं हे ट्वीट सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहे. रणदीप हुड्डानं त्याच्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘माझं संपूर्ण करिअर आणि थिएटर्समधल्या आठवणी पार्ले जी आणि चहाशी जोडलेल्या आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जर फक्त पार्ले-जी कंपनी त्यांचं पॅकिंग बायोडिग्रेडेल मटेरिलअल बदलेल तर तर किती प्रमाणात सिंगल यूज प्लास्टिक कचरा कमी होईल. आता या बिस्किटची विक्री सुद्धा चांगली होत आहे तर तुम्ही भविष्य चांगलं घडवण्यामध्ये नक्कीच योगदान देऊ शकता.’ दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट, आत्महत्या नाही तर ‘या’ कारणामुळे झाला मृत्यू
दरम्यान देशात नेहमीच सिंगर यूज प्लास्टिकचा वापर कमी करणे किंवा त्यावर बंदी आणण्याची मागणी होत असते. अनेक राज्यात सिंगल यूज प्लास्टिक वापरण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. काही काळापूर्वी प्लास्टिकच्या वापरावर बंदी आणण्यासाठी अभियान सुद्धा सुरू करण्यात आलं होतं. ज्याचा उद्देश देशाला प्लास्टिक मुक्त करण्याचा होता. वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर रणदीप हुड्डा काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘Extraction’ या सिनेमात दिसला होता. ज्यात त्यानं क्रिस हेम्सवर्थसोबत स्क्रीन शेअर केली होती. लवकरच तो सलमान खानच्या ‘राधेः युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या सिनेमाचं प्रदर्शन रखडलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभूदेवानं केलं असून यात सलमान सोबत दिशा पाटनी मुख्य भूमिकेत आहे. मीकानं बर्थडे पार्टीत राखीला जबरदस्ती केलं KISS, अनेक वर्षांनी दिलं स्पष्टीकरण लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्यांना बिग बींनी दिला मदतीचा हात, विमानानं सोडणार घरी