लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्यांना बिग बींनी दिला मदतीचा हात, विमानानं सोडणार घरी

लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्यांना बिग बींनी दिला मदतीचा हात, विमानानं सोडणार घरी

सरकारनं लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट दिल्यानंतर बिग बींनी जे लोक लॉकडाऊनमुळे मुंबईमध्ये अडकले आहेत अशा सर्वांना विमानानं त्यांच्या घरी सोडण्याची सोय केली आहे.

  • Share this:

मुंबई, 10 जून : सध्या कोरोना व्हायरसनं देशभरात थैमान घातलं आहे. अशात मार्च महिन्यापासून केंद्र सरकारनं केलेल्या लॉकडाऊनमुळे नोकरी किंवा कमाधंद्यांसाठी मुंबईमध्ये आले आहेत असे अनेकजण इथेच अडकून पडले आहेत. मागच्या काही दिवसांपासून अभिनेता सोनू सूद अनेक प्रवासी मजूरांना त्यांच्या घरी सोडण्याचं काम करताना दिसत आहे. यात आता महानायक अमिताभ बच्चन यांचही नाव जोडलं गेलं आहे. नुकतंच सरकारनं या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथीलता दिल्यानंतर बिग बींनी जे लोक लॉकडाऊनमुळे मुंबईमध्ये अडकले आहेत अशा सर्वांना विमानानं त्यांच्या घरी सोडण्याची सोय केली आहे.

उत्तर प्रदेश सारख्या राज्यांतील नोकरी निमित्त मुंबईत राहणाऱ्या अशा अनेकांना सध्या लॉकडाऊनमुळे घरी बसावं लागलं आहे. त्यांना अनेक समस्यांनाही तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे अनेकांनी आता आपल्या मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. बिग बी अमिताभ बच्चन या सर्वांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. अशा सर्वांना विमानानं घरी सोडण्याची सोय अमिताभ बच्चन यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यांनी उत्तर प्रदेशसाठी 6 चार्टर्ड फ्लाइट बुक केल्या आहेत. यातील प्रत्येक फ्लाइटमध्ये 180 प्रवासी याप्रमाणे लोकांना उत्तरप्रदेशला सोडलं जाणार आहे. ज्यात आज 4 तर उद्या 2 फ्लाइट मुंबईवरून लखनऊ, गोरखपूर आणि वाराणसी येथे सोडल्या जाणार आहेत.

Unlock 1.0 होताच दारू आणायला निघाले शक्ति कपूर, VIDEO पाहून आवरणार नाही हसू

 

View this post on Instagram

 

Chale bhaiya gym .. baad mein milte hain .. gym yahin hai ghar ke bahar nahin

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

कोरोना व्हायरस दरम्यानं अनेक बॉलिवूड कलाकार मदत करताना दिसत आहेत. ज्यात महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांची टीम सुद्धा यावर काम करत आहे. फुड पॅकेट्स, ड्राय फुड्स, पाण्याच्या बॉटल, चप्पल अशा काही वस्तू प्रवासी मजूरांना वाटल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्या टीमनं अनेक प्रवासी मजूरांनी मुंबईतून उत्तर प्रदेशला पोहचवण्याची सोय केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार 28 मे ला हाजी अली वरून यूपीसाठी 10 पेक्षा जास्त बस पाठवण्यात आल्या होत्या.

भारतीय महिलांच्या सेक्शुअलिटीवर प्रश्न, ऐश्वर्याचं ओप्रा विन्फ्रेला सडेतोड उत्तर

याशिवाय अमिताभ बच्चन कोरोना वॉरिअर्सना सुद्धा मदत करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी 20 हजार पीपीई किट्स आमि फुड पॅकेट्स वाटली आहेत. अमिताभ बच्चन अनेक सरकार योजनांसोबतही काम करत आहे. ज्यातून लोकांमध्ये या व्हायरसबाबत जागरुकता निर्माण केली जाईल. सातत्यानं ते चाहत्यांना सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देत आहेत.

मीकानं नॅशनल टेलिव्हिजनवर कनिका कपूरला म्हटलं होतं पत्नी, वाचा नेमकं काय घडलं

First published: June 10, 2020, 12:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading