Home /News /entertainment /

दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट, आत्महत्या नाही तर 'या' कारणामुळे झाला मृत्यू

दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट, आत्महत्या नाही तर 'या' कारणामुळे झाला मृत्यू

प्रसिद्ध सेलिब्रेटी मॅनेजर दिशा सालियान हिचा मृत्यू सुरुवातीला आत्महत्या असल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र आता या प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे.

  मुंबई, 10 जून : प्रसिद्ध सेलिब्रेटी मॅनेजर दिशा सालियान हिचा एका बहुमजली इमारतीवरून खाली पडल्यानं मृत्यू झाल्याचं वृत्त मंगळवारी संध्याकाळी समोर आलं होतं. तिच्या मृत्यू सुरुवातीला आत्महत्या असल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र आता या प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिशा सालियाननं आत्महत्या केली नसून तिचा इमारतीवरून खाली पडल्यामुळे अपघाती मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे घडली होती. नवभारत टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार दिशा सालियान तिच्या आई-वडीलांसोबत दादर येथे राहते. ती सोमवारी ती तिच्या काही फ्रेंड्ससोबत मलाड येथे आली होती. या ठिकाणी हे सर्वजण 12 व्या मजल्यावर अभिनेता रोहन रॉयच्या फ्लॅटवर जमले होते. यावेळी या ठिकाणी एकूण 6 लोक होते. रात्री जेवण झाल्यानंतर सर्वजण दारू पित होते. दिशा सुद्धा नशेत होती आणि अशाच अवस्थेती ती खिडकीच्या जवळ गेली. नशेत असताना 1 वाजता खिडकीतून तोल जाऊन खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला.
  View this post on Instagram

  💞✨💫

  A post shared by @ disha265 on

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिशाच्या मित्रांनी पहाटे 2.25 वाजता या घटनेची माहिती पोलिसांनी दिली होती. पोलीस जेव्हा त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा दिशा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. त्यानंतर तिचा मृतदेह कांदिवलीच्या शताब्दी पोस्टमॉर्टेमसाठी नेण्यात आला. पोलीसांनी सांगितलं की, दिशाच्या आई-वडीलांनीही ही कोणत्याही प्रकारची हत्या किंवा कट असल्याचं म्हटलेलं नाही. मात्र काही दिवसांपासून दिशा तिच्या कामामुळे डिस्टर्ब होती असं त्यांनी सांगितलं. मात्र पोलिसांनी निश्चतपणे ही आत्महत्या कि अपघात होता याबाबत काहीही सांगितलेलं नाही. कारण त्यावेळी दिशा नशेत होती आणि अद्याप तिच्या फ्रेंड्चे स्टेटमेंट घेतले गेलेले नाहीत.
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या