मुंबई, 10 जून : बॉलिवूड सिंगर मीका सिंहचा आज वाढदिवस. आज मीका बॉलिवूडमधील एक लोकप्रिय गायक म्हणून ओळखला जातो. त्यानं आता पर्यंत बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. पण यासोबत तो अनेकदा वादातही सापडला होता. 14 वर्षांपूर्वी मीका सिंहच्या बर्थडे पार्टीत असं काही घडलं होतं. ज्यामुळे मीका खूपच चर्चेत आला होता. आजही लोक हा वाद विसरलेले नाहीत. या बर्थ डे पार्टीमध्ये मीका सिंहनं सर्वांसमोर राखी सावंतला जबरदस्तीनं किस केलं होतं आणि ही गोष्ट रातोरात व्हायरल झाली होती. मात्र मीकानं असं का केलं याचं स्पष्टीकरण त्यानं एका मुलखतीत दिलं.
ही घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी मीका सिंहनं याबाबत स्वतःच खुलासा केला. त्यानं एका मुलाखतीत राखी सावंतसोबत असं का वागला याचं कारण सांगितलं. तो म्हणाला, मी अंधेरीच्या एका पबमध्ये माझी बर्थडे पार्टी ठेवली होती. या पार्टीसाठी मी काही निवडक लोकांना बोलवलं होतं. यात प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर आशिष शेरवूड सुद्धा सहभागी झाले होते. मी राखीला बोलवलं नव्हतं कारण मला तिचं वागणं माहित होतं. पण ती आशिषसोबत आली होती आणि माझ्यासोबत ओव्हर फ्रेंडली वागत होती. पण माझ्यावर याचा फरक पडला नाही. मी माझी पार्टी एन्जॉय करत होतो.
मीकानं पुढे सांगितलं, पार्टीमध्ये सर्वाकाही ठिक चाललं होतं. राखी सुद्धा पार्टी एन्जॉय करत होती. पण सर्व काही तेव्हा खराब झालं जेव्हा तिनं माझ्या चेहऱ्यावर केक लावायचा प्रयत्न केला. मला स्कीन एलर्जी आहे. मी तिला असं करू नको असं सांगितलं होतं पण जेव्हा मी केक कापला तेव्हा मी नको म्हणून सांगितलेलं असतानाही राखीनं माझ्या चेहऱ्यावर जबरदस्ती केक लावला. मला राग आला आणि रागाच्या भरात तिला धडा शिकवण्यासाठी मी तिला सर्वांसमोर किस केलं. त्यानंतर राखीनं बाहेर जाऊन खूप गोंधळ घातला.
अंकिता लोखंडेनं लॉकडाऊनमध्ये गुपचूप उरकला साखरपुडा? Photos मुळे उठले सवाल
याशिवाय मीका सिंह आणखी एका किस प्रकरणामुळे चर्चेत आला होता. हे प्रकरण होतं कपिल शर्मा शोमधील. शोनंतर मीकानं बिपाशासोबतचा एक फोटो शेअर केला होता ज्यात त्यानं बिपाशानं त्याला किस केल्याचा दावा केला होता. ज्यामुळे बिपाशा खूप नाराज झाली होती. बिपाशानं सांगितलं होतं की, तिनं मीकाला नाही तर शोमधील दादी म्हणजेच अली असगरला किस केलं होतं.
Unlock 1.0 होताच दारू आणायला निघाले शक्ति कपूर, VIDEO पाहून आवरणार नाही हसू