मुंबई, 19 सप्टेंबर : अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असल्याचं दिसत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ बॉयकॉटच्या कचाट्यात सापडला असतानाही या चित्रपटाचा जादू फिकी पडली नाही. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. आलिया सध्या गरोदर असूनही खूप हार्ड वर्क करत असल्याचं दिसत आहे. गरोदर पणातही काम करत असल्यामुळे आलियाला चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे. यावर आता रणबीर कपूरने प्रतिक्रिया दिली आहे. आलियावर टीका करणाऱ्यांसाठी रणबीर म्हणाल की, ‘मला वाटतं की तिने गरोदरपणात आमच्या चित्रपटाचे प्रमोशन ज्या प्रकारे केलं, त्यामुळेमी तिच्यापासून प्रेरित झालोय. तिच्यावर आत्ता ज्या प्रकारे तिच्यावर कोणत्याही प्रकारची टीका केली जातेय ही केवळ लोकांची मत्सर आणि मूर्खपणा आहे’. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रणबीर म्हणाला, ‘आलिया ही भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत महत्त्वाची अभिनेत्री आहे. ती केवळ माझी पत्नी आहे म्हणून मी हे बोलत नाही. तिचं चित्रपटक्षेत्रातील योगदान, तिचा स्क्रीनवरील वावर, तिचा आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. मी आजवर हे गुण कोणत्याही कलाकारात पाहिलेले नाहीत. याचा आपण सगळ्यांनीच आदर करायला हवा’. हेही वाचा - विराट कोहलीमुळे अनुष्का शर्मा झाली इमोशनल; म्हणाली, ‘या व्यक्तीसोबत…’ आलिया भट्ट गरोदरपणातही पूर्ण उत्साहाने काम करतेय. हे पाहून तिचे चाहते खूप आनंदी आणि प्रभावित झाले आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे की, ‘इंडस्ट्रीत अशा खूप कमी अभिनेत्री आहेत, ज्यांनी गरोदरपणातही खूप काम केले आहे. आता या यादीत आलिया भट्टच्या नावाचाही समावेश झाला आहे’.
दरम्यान, 14 एप्रिल रोजी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी घरात एका खाजगी समारंभात लग्न केले. यामध्ये केवळ मित्र आणि कुटुंबीयांचा सहभाग होता. यानंतर आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने गरदोरपणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. या बातमीने दोघांच्याही चाहत्यांना सुखद धक्काच बसला.