मुंबई, 18 सप्टेंबर : बॉलिवूड आणि क्रिकेट यांच्यामधील घनिष्ठ नातं कायमच लोकांना भुरळ पाडत आलेलं आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्स लग्नबंधनातही अडकले आहेत. या जोड्यांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेमही मिळालं आहे. यातीलच एक पॉवल कपल म्हणून ओळखलं जाणारं जोडपं म्हणजे क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा. दोघेही सतत चर्चेत असतात. नुकतंच अनुष्कानं एक पोस्ट शेअर केली असून ती विराटला खूप मीस करत आहे. अनुष्का शर्माने विराटसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत अनुष्कानं विराटला मीस करत असल्याचं सांगितलं आहे. ‘जेव्हा तुम्ही या ठिकाणी किंवा हॉटेलच्या बायो-बबलमध्ये या व्यक्तीसोबत असता तेव्हा जग अधिक रोमांचक, मजेदार आणि सुंदर दिसते.’, असं लक्षवेधी कॅप्शन अनुष्कानं शेअर केलं आहे.यासोबतच हॅशटॅगमध्ये लिहिले – मिसिंग हबी पोस्ट.
अनुष्का शर्मा सध्या ‘चकडा एक्सप्रेस’च्या शूटिंगच्या निमित्ताने यूकेमध्ये आहे. विराटपासूनचं अंतर अनुष्काला सहन होत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे ती विराटला खूप मीस करत आहे. विराट कोहली सध्या मोहालीत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी तो पंजाबमध्ये पोहोचला आहे. हेही वाचा - PHOTO: साऊथची स्टार नयनताराने बुर्ज खलिफाजवळ सेलिब्रेट केला पतीचा बर्थडे, दिलं खास सरप्राईज दरम्यान, अनुष्काच्या या पोस्टने सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधलं आहे. विराटनेही या पोस्टला प्रतिक्रिया दिली आहे. अनुष्काच्या या पोस्टवर अनेक लाईक्स आणि कमेेंटचा पाऊस होत आहे.

)







