जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Ranbir Kapoor: रणबीरने सेलिब्रेट केला लग्नानंतरचा फर्स्ट बर्थडे; आलियाने दिली जंगी पार्टी

Ranbir Kapoor: रणबीरने सेलिब्रेट केला लग्नानंतरचा फर्स्ट बर्थडे; आलियाने दिली जंगी पार्टी

रणबीर-आलिया

रणबीर-आलिया

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने काल आपला वाढदिवस साजरा केला. या हॅन्ड्सम हंक अभिनेत्याने यंदा चाळीशी पार केली आहे. हा वाढदिवस रणबीर आणि आलियासाठी फारच खास होता.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 सप्टेंबर-   बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने काल आपला वाढदिवस साजरा केला. या हॅन्ड्सम हंक अभिनेत्याने यंदा चाळीशी पार केली आहे. हा वाढदिवस रणबीर आणि आलियासाठी फारच खास होता. कारण या दोघांच्या लग्नानंतरचा हा पहिलाच वाढदिवस होता. रणबीरच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त आलियाने जंगी सेलिब्रेशन केलं. यावेळी एका पार्टीचसुद्धा आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये बॉलिवूड कलाकारांनीं हजेरी लावली होती. आलियाने काल उशिरा सोशल मीडियावर रणबीरच्या बर्थडे सेलिब्रेशनचा एक फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री आणि रणबीरची पत्नी आलिया भट्टने इन्स्टाग्राम अकाउंटवर रणबीर कपूरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो अभिनेत्याच्या बर्थडे सेलिब्रेशनचा असल्याचं दिसून येत आहे. या फोटोमध्ये रणबीरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये आलियाने रणबीरचा फोटो हातात घेतला आहे. ज्यामध्ये ‘चीयर्स टू 40 इयर्स’ असं लिहलं आहे. रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनीही आलियाच्या या फोटोवर एक सुंदर इमोजी पोस्ट केली आहे. तसेच चाहत्यांसोबतच अनेक सेलेब्रेटींनी या फोटोंवर लाईक्स कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. रणबीर कपूर हा अत्यंत शांत आणि गोड अभिनेता समजला जातो.तो आपल्या चाहत्यांशी नेहमीच हटके अंदाजात संवाद साधतो. यंदा रणबीर कपूरने वाढदिवसानिमित्त चाहत्यांची भेट घेतली. त्याच्या अपार्टमेंटच्या बाहेर अनेक चाहते उपस्थित होते. रणबीर बाहेर निघताच चाहते उत्सुक झाले होते. यावेळी कारमध्ये बसून रणबीर कपूरने चाहत्यांसोबत केक कापला आणि सर्वांचे आभार मानले. यादरम्यान आलिया भट्टही रणबीरसोबत कारमध्ये बसलेली दिसून आली. त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी त्याच्यासोबत सेल्फी घेत त्याला शुभेच्छा दिल्या आणि त्याचे आभारदेखील व्यक्त केले.

News18लोकमत
News18लोकमत

रणबीरच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या घरी एका आलिशान पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत करण जोहर, अयान मुखर्जीसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. या पार्टीचा फोटोही समोर आला आहे.

जाहिरात

(हे वाचा: Ranbir Kapoor B’day:रणबीर कपूरचं कार कलेक्शन आहे जबरदस्त; अभिनेत्याची एकूण संपत्ती माहितेय का? **)** रणबीर कपूर आपल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या यशानंतर सेलिब्रेशनमध्ये व्यग्र आहे. काही महिन्यांपूर्वी रणबीर कपूरने आलिया भट्टसोबत लग्न केलं होतं. आता रणबीर आणि आलिया लवकरच आईबाबा बनणार आहेत. दोघेही पालक होण्यासाठी खूप उत्सुक आहेत.नुकतंच आलिया पती रणबीर सोबत आपल्या नव्या घराच्या बांधकाम साईटवर गेली होती. याठिकाणी ते आपल्या नव्या घराचं निरीक्षण करत होते. तसेच आपल्या इंटेरियर डिझायरशी गप्पा मारत होते. दरम्यान आलिया भट्ट पुढे येऊन बाल्कनीत खाली वाकून बघताना दिसून आली. विशेष म्हणजे आलिया किंचितशी पुढे येताच रणबीरने काळजीपोटी आपल्या पत्नीचा हात पकडला. हा व्हिडीओसुद्धा सध्या तुफान व्हायरल झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात