मुंबई, 28 जानेवारी : अभिनेता रणबीर कपूर कायमच चर्चेत राहतो. नुकतंच त्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. श्रद्धा कपूर सोबतच्या या ट्रेलरमुळे रणबीर चांगलाच चर्चेत आला.काल सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे रणबीर प्रचंड ट्रोल झाला होता. नेटकरी तसेच चाहते देखील त्याच्यावर प्रचंड नाराज झालेले दिसत आहे. या व्हिडिओमध्ये चाहत्यासोबत केलेल्या त्या कृतीमुळे त्याच्यावर प्रचंड टीका झाला होती. पण आता रणबीर असं का वागला याचं खरं कारण समोर आलं आहे. काल रणबीर कपूरचा धक्कादायक व्हिडिओ समोर होता. या व्हिडिओमध्ये रागाच्या भरात त्याने चाहत्याचा मोबाईल फॅन फेकून दिला. हे संपूर्ण प्रकरण पापाराझीच्या कॅमेऱ्यात कैद झाले. रणबीर कपूर नुकताच मुंबईत स्पॉट झाला. त्याला पाहताच अनेक चाहते त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आले. एक चाहता रणबीर कपूरकडे येतो. रणबीरही हसतमुखाने पोझ देतो. रणबीरने फॅन्ससोबत पहिल्यांदा आणि नंतर दुसऱ्यांदा पोज दिली. पण जेव्हा चाहते तिसऱ्यांदा नवीन सेल्फी क्लिक करू लागतात तेव्हा रणबीर रागावला आणि त्याच्या हातातून फोन हिसकावात मागे फेकून दिला. रणबीरच्या या कृतीमुळे चाहत्यांनी त्याला ट्रोल केलं. हेही वाचा - ‘तिहार जेलमध्ये त्याने मला…’ अभिनेत्री चाहत खन्नाचा सुकेश चंद्रशेखरबद्दल धक्कादायक खुलासा हा व्हिडिओ पाहून चाहते रणबीर कपूरला विविध प्रश्न विचारत आहेत. या सगळ्यानंतर त्याला फॅन्सचा फोन फेकून द्यावा लागला असं नक्की काय झालं असा सवाल चाहते विचारत आहेत.
दरम्यान, या व्हिडीओ मागचं सत्य आता समोर आलं आहे. आता या व्हिडीओचा पुढचा भाग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रणबीर त्या चाहत्याचा जुना फोन फेकून त्याला नवीन OPPOReno8T हा नवीन फोन भेट म्हणून देतो. हा एक प्रमोशनल व्हिडीओ असल्याचे आता समोर आले आहे. रणबीरचा हा पब्लिसिटी स्टंट होता. एका मोबाईल ब्रॅण्डच्या जाहिरातीसाठी तो चाहत्यासोबत असं वागला.
दरम्यान, रणबीर कपूरने ब्रह्मास्त्र मधून बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांनंतर कमबॅक केलं. त्यानंतर तो शमशेरा मध्ये दिसला. त्याचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार यशस्वी ठरला नाही. आता येणाऱ्या काळात तो श्रद्धा कपूर सोबत ‘तू जुठी मै मक्कार’ या सिनेमांत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर या चित्रपटात पहिल्यांदाच सोबत काम करणार आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी त्यामुळे रणबीर आणि श्रद्धाचे चाहते खूप उत्सुक आहेत.

)







