मुंबई, 27 जानेवारी : अभिनेता रणबीर कपूर कायमच चर्चेत राहतो. नुकतंच त्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. श्रद्धा कपूर सोबतच्या या ट्रेलरमुळे रणबीर चांगलाच चर्चेत आला. आता सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे रणबीर प्रचंड ट्रोल होत आहे. नेटकरी तसेच चाहते देखील त्याच्यावर प्रचंड नाराज झालेले दिसत आहे. या व्हिडिओमध्ये चाहत्यांसोबत केलेल्या त्या कृतीमुळे त्याच्यावर प्रचंड टीका होत आहे. नक्की काय आहे या व्हिडिओमध्ये जाणून घ्या.
रणबीर कपूरचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये रागाच्या भरात त्याने चाहत्याचा मोबाईल फॅन फेकून दिला. हे संपूर्ण प्रकरण पापाराझीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते रणबीर कपूरला विविध प्रश्न विचारत आहेत. या सगळ्यानंतर त्याला फॅन्सचा फोन फेकून द्यावा लागला असं नक्की काय झालं असा सवाल चाहते विचारत आहेत.
हेही वाचा- Kangana Ranaut: 'हिंदू देशात पठाण हिट झाला तरी...', कंगना रणौतचं मोठं वक्तव्य
रणबीर कपूर नुकताच मुंबईत स्पॉट झाला. त्याला पाहताच अनेक चाहते त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आले. एक चाहता रणबीर कपूरकडे येतो. रणबीरही हसतमुखाने पोझ देतो. रणबीरने फॅन्ससोबत पहिल्यांदा आणि नंतर दुसऱ्यांदा पोज दिली. पण जेव्हा चाहते तिसऱ्यांदा नवीन सेल्फी क्लिक करू लागतात तेव्हा रणबीर रागावला आणि त्याच्या हातातून फोन हिस्कावात मागे फेकून दिला.
View this post on Instagram
रणबीरच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी कमेंट करत हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं आहे. तर कित्येकांनी ही जाहिरात असल्याचंही म्हटलं आहे. काहींनी या व्हिडीओवर कमेंट करत रणबीरला ट्रोल केलं आहे. 'नेमकं काय झालं असेल?', अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने 'अहंकारी रणबीर कपूर', असं देखील म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने 'अजून बना याचे चाहते', अशी कमेंट केली आहे. आता हा व्हिडीओ खरंच पब्लिसिटी स्टंट आहे रणबीर कपूर चाहत्यासोबत खरंच असं वागला हे येणाऱ्या काळात समोर येईल.
दरम्यान, रणबीर कपूरने ब्रह्मास्त्र मधून बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांनंतर कमबॅक केलं. त्यानंतर तो शमशेरा मध्ये दिसला. त्याचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार यशस्वी ठरला नाही. आता येणाऱ्या काळात तो श्रद्धा कपूर सोबत 'तू जुठी मै मक्कार' या सिनेमांत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर या चित्रपटात पहिल्यांदाच सोबत काम करणार आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी त्यामुळे रणबीर आणि श्रद्धाचे चाहते खूप उत्सुक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.