मुंबई, 19 मार्च : अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपूर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. या दोघांनी सुद्धा त्यांच्या नात्याबाबत कोणतीही गोष्ट लपवलेली नाही. एवढंच नाही तर आलियानं एका अवॉर्ड फंक्शनमध्येच रणबीरवर आपलं खूप प्रेम असल्याचं कबुल केलं होतं. पण नुकतेच आलियाच्या बर्थडे सेलिब्रेशनचे जे फोटो समोर आले त्यात मात्र रणबीर कुठेच दिसला नाही. त्यामुळे सध्या या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. सध्या कोरोना व्हायरसमुळे घरी असतानाही आलिया भट तिच्या गर्ल्स गँगसोबत एन्जॉय करताना दिसत आहे. याशिवाय हे दोघं रिलेशनशिपमध्ये असूनही तिच्या वाढदिवसाला रणबीर कुठेच दिसला नाही. इतकंच नाही तर त्यानं तिला बर्थडे विश सुद्धा केलेलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रणबीर कपूरनं आलियासोबत चांगला व्यवहार केलेला नाही ज्यामुळे या दोघांमध्ये वाद होऊन आलियानं रणबीरशी ब्रेकअप केलं आहे. SHOKING! अभिनेत्री जसलीन मथारू आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी
ईटी टाइम्सला दिलेल्या वृत्तानुसार रणबीर-आलियाच्या जवळच्या सुत्रांनी हे या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे. आलिया आणि रणबीरमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही आणि ते दोघंही एकत्र आहेत त्यांचा ब्रेकअप झालेलं नाही. असं सूत्रांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी आलियानं तिचा 28 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी ती आपल्या मैत्रिणींसोबत एन्जॉय करताना दिसली आणि रणबीर मात्र यात कुठेच दिसला नव्हता. त्यामुळे या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात होतं. मिलिंद सोमण असा पडला स्वतःपेक्षा 25 वर्षांनी लहान असलेल्या अंकिताच्या प्रेमात!
आलिया आणि रणबीर लवकरच ब्रह्मास्त्र सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच दिग्दर्शन अयान मुखर्जीनं केलं आहे. या सिनेमात आलिया-रणबीर व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, मौनी रॉय, डिंपल कपाडिया यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा 4 डिसेंबर 2020 ला रिलीज होणार आहे. हा सिनेमा हिंदी, तमिल, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज होणार आहे. ईशा गुप्तानं शेअर केला बाथटबमधील VIDEO; चाहते म्हणाले, ‘हाय गर्मी…’