Coronavirus मुळे मुंबईत जिम बंद, जॅकलिननं शेअर केले HOT योगा व्हिडीओ

Coronavirus मुळे मुंबईत जिम बंद, जॅकलिननं शेअर केले HOT योगा व्हिडीओ

जगभारात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला असताना जॅकलिन फर्नांडिसच्या हॉट योगाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • Share this:

मुंबई,17 मार्च : सध्या जगभारात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. भारतात (India) कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या 114 वर पोहोचली आहे. या व्हायरसचा अधिक प्रसार होऊ नये, यासाठी सरकार टप्प्याटप्प्याने पावलं उचलतं आहे, काही निर्णय घेतं आहे. सरकारने नागरिकांना गर्दीत जाण्यास मनाई केली आहे, काही ठिकाणी जाण्यास बंदी घातली आहे. याशिवाय शाळा, कॉलेज आणि जिम हे सुद्धा बंद ठेवण्यात आलं.पण त्यामुळे तुमच्या फिटनेसवर मात्र दुर्लक्ष करु नका असं अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं म्हटलं आहे. यासोबतच तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर काही योगासनांचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

कोरोना व्हायरसमुळे जिम बंद करण्यात आल्या असल्या तरीही जॅकलिननं शेअर केलेले ही सोपी योगासनं करुन तुम्ही नक्कीच फिट राहू शकता. जॅकलिनचे हे हॉट योगा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये ती स्ट्रेच योगा करताना दिसत आहे. पहिला व्हिडीओ शेअर करताना जॅकलिननं लिहिलं, ‘स्ट्रेचमुळे तुमचा मणका चांगला राहतो आणि तुम्ही दिवसभर उत्साही राहता. योगा करणं मला खूप आवडतं. मग मी कुठेही असले तरीही. हा योगाप्रकार तुम्हीला कुठेही करता येण्यासारखा आहे.’ या व्हिडीओमध्ये जॅकलिन बॉडी स्ट्रेचिंग करताना दिसत आहे.

'खतरों के खिलाडी' कंटेस्टंटचा BOLD लुक, बिकिनी फोटोशूट सोशल मीडियावर VIRAL

 

View this post on Instagram

 

Stretch 💖 keep that spine healthy and happy! Yoga poses are my fav, anytime, anywhere!

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

जॅकलिननं एका मागोमाग एक असे 2 व्हिडीओ शेअर केले आहेत. दुसऱ्या व्हिडीओमध्ये जॅकलिन चांगलं म्युझिक ऐकण्याचा सल्ला देतान दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ‘व्यायाम करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही चांगलं गाणं ऐकत श्वास घेत राहा. ज्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल.’

मराठी सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं निधन

 

View this post on Instagram

 

💖 make sure you put on some good relaxing music 💖💖💖 and breathe!!!

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

जॅकलिनचे हे व्हिडीओ तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील याशिवाय अभिनेत्री कतरिना कैफनं सुद्धा तिच्या इन्स्टाग्रामवर काही घरच्या घरी करता येण्यासारख्या वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर केला आहे. याशिवाय याच्या कॅप्शनमध्ये तिनं या वर्कआऊटची सविस्तर माहिती सुद्धा दिली आहे.

जॅकलिनच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती काही दिवसांपूर्वीच बिग बॉस स्पर्धक आसिम रियाजसोबत एका अल्बम साँगमध्ये दिसली होती. जॅकलिन मागच्या काही काळापासून बॉलिवूडपासून दूर आहे. मागच्या वर्षी रिलीज झालेल्या साहो सिनेमाच्या आयटम साँगमध्ये ती शेवटची दिसली होती. याशिवाय यंदा ती जॉन अब्राहमसोबत अ‍ॅटॅक या सिनेमात दिसणार आहे.

‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुरने बाबांच्या वाढदिवशी घेतली नवी चारचाकी गाडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 17, 2020 09:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading