मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Rajkumar Rao: 'बढाई दो' फेम अभिनेत्याच्या मिशा झाल्या गायब, स्वत:ला म्हणतोय छपरी

Rajkumar Rao: 'बढाई दो' फेम अभिनेत्याच्या मिशा झाल्या गायब, स्वत:ला म्हणतोय छपरी

राजकुमार राव (Rajkumar Rao) अभिनेत्याचा अंदाज काही निराळाच आहे. त्याचा नवा आणि चकचक लुक पाहिलात का?

राजकुमार राव (Rajkumar Rao) अभिनेत्याचा अंदाज काही निराळाच आहे. त्याचा नवा आणि चकचक लुक पाहिलात का?

राजकुमार राव (Rajkumar Rao) अभिनेत्याचा अंदाज काही निराळाच आहे. त्याचा नवा आणि चकचक लुक पाहिलात का?

मुंबई 20 जून: बॉलिवूडमधील एक गुणी अभिनेता म्हणून ओळख असणारा राजकुमार राव (Rajkumar Rao) हा नव्या पिढीचा एक तडफदार चेहरा आहे. राजकुमार राव हा एक कूल बॉय म्हणून ओळखला जातो. त्याचा एकदम हटके अँड मस्त अंदाज सगळ्यांनाच कायम भावतो. राजकुमाराच्या नव्या पोस्टची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे.

राजकुमार इन्स्टाग्रामवर बराच ऍक्टिव्ह असतो. सध्या तो आणि त्याची बायको पत्रलेखा (Rajkumar Rao Wife) ऍमस्टरडॅम, रोम, इटली अशा मोठ्या vacation वर गेले आहेत. तो गेले अनेकदिवस त्याच्या या ट्रिपचे फोटो शेअर करत आहे. बायकोसोबत राजकुमार धमाल करताना दिसत आहे. त्याच्या याच ट्रीपमधलं एक रील सध्या प्रचंड viral होताना दिसत आहे.

त्याने capri मध्ये एक रील शूट केलं आहे. त्या रीलला त्याने एकदम भन्नाट कॅप्शनसुद्धा दिल आहे. ‘केप्री का छपरी’ असं म्हणत त्याने एकदम डॅशिंग pose दिलेले फोटो शेअर केले आहेत. यामध्ये राजकुमार भडक पोपटी रंगाचा शर्ट घालून क्लीन शेव्ह लूकमध्ये दिसत आहे. त्याला इतके दिवस पिळदार मिश्यांमध्ये बघणाऱ्या फॅन्ससाठी हा धक्का आहे पण त्याचा हा लुक एकदम कूल आहे हे मात्र नक्की.

या रीलवर भूमी पेडणेकरने खास कमेंट करत राजकुमारची गंमत करायचा प्रयत्न केला आहे. भूमी असं लिहिते, ‘अरे किमान शर्टाला इस्त्री तरी करायचीस.” भूमीच्या या भन्नाट कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

हे ही वाचा- Box office clash: बॉलिवूडमध्ये एक दोन नाही तब्ब्ल 15 पेक्षा जास्त फिल्मची होणार घमासान टक्कर

राजकुमार आणि भूमी यांच्या दोस्तीबद्दल तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. याआधीच चित्रपट सुद्धा भूमी आणि राजकुमार यांनी एकत्र केला. या रीलवर राजकुमाराच्या पत्नीने सुद्धा कमेंट केली आहे.

वर्क फ्रंटवर सांगायचं तर राजकुमार सध्या ‘हिट: द फर्स्ट केस’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. यात तो एका चतुर पोलिसाची भूमिका करत आहे. त्याच्या या फिल्मबद्दल चाहत्यांच्या मनात बरीच उत्सुकता आहे. राजकुमारचा करिअर ग्राफ बघता हा चित्रपट दर्जेदार असेलच यात चाहत्यांना शंका नाही. यात सैन्य मल्होत्रा सुद्धा मुख्य भूमिकेत आहे.

First published:
top videos

    Tags: Rajkumar rao