मुंबई 25 जून: बॉलिवूडच्या कपलचं प्रेम आणि अचानक होणारे ब्रेकअप याची तर आता सगळ्यांनाच सवय आहे. कलाकारांचं जमणारं प्रेम त्यांची लव्हस्टोरी आणि त्यानंतर झालेल्या ब्रेकप अशा सगळ्याचबद्दल अगदी आवडीने चर्चा केली जाते. बोलीववूडमध्ये जिथे काही ठिकाणी ब्रेकअप झालं की एकमेकांसोबत काम न करणारे कलाकार आहेत तर काही काही ठिकाणी आपलं प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ वेगळं ठेऊन आपल्या आधीच्या पार्टनरसोबत काम करणारे कलाकार सुद्धा आहेत. असंच एक ex couple एकमेकांसोबत शूटिंगच्या निमित्ताने एकत्र येणार आहे आणि ते कपल म्हणजे (Deepika Padukone and Ranbir Kapoor) दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर.
बॉलिवूडच्या काही गाजलेल्या कपलपैकी एक म्हणजे (Ranbir and Deepika) रणबीर आणि दीपिका. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण हे एकमेकांसोबत बराच काळ रिलेशनशिप मध्ये होते पण काही कारणांनी त्यांचं ब्रेकअप (Ranbir and Deepika breakup) झालं. पण दोघांनीही अजून प्रोफेशनलिजम सोडला नाहीये. दीपिका रणबीर यांनी ब्रेकअपनंतर सुद्धा एकत्र येत अयान मुखर्जीसोबत एक फिल्म एकत्र केली होती. त्यांच्यातली केमिस्ट्री कायमच चाहत्यांना आवडत आली आहे त्यामुळे हे कपल कोणत्या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.
पण चित्रपटासाठी चाहत्यांना काही काळ वाट पाहावी लागेल. सध्या तरी रणबीर दीपिका एका ऍडफिल्मच्या शूटिंगच्या निमित्ताने एकत्र दिसणार (Ranbir and Deepika together again) आहेत. पुनीत मल्होत्राने ही जादू करून दाखवत या दोघांना एकत्र एका छताखाली आणलं आहे. एका बेव्हरेज ब्रँडच्या जाहिरातीसाठी हे दोघेही एकत्र दिसणार आहेत. फिल्ममेकर पुनीत मल्होत्रा या जाहिरातीचं दिग्दर्शन करणार अशी माहिती समोर येत आहे.
View this post on Instagram
बॉलिवूड कलाकार सध्या अनेक ब्रँड एन्डॉर्समेंट साठी ट्रोल केले जातात. कधी पानमसाला कधी हानिकारक पेयं अशा अनेक गोष्टींबद्दल त्यांना ट्रोलिंग सहन करावं लागतं. या ऍडमुळे या जोडीला पुन्हा एकत्र पाहता येणार आहे ही एक चांगली गोष्ट समोर आली आहे पण अजून ही जाहिरात कोणत्या ब्रॅण्डची असेल याबद्दल माहिती दिलेली नाही.
रणबीर आणि दीपिकाच्या ऑन स्क्रीन केमिस्ट्रीचं कायमच कौतुक होत आलं आहे. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट एकत्र केले आहेत. असं सांगितलं जातं की आता त्यांच्या मनात कोणतीच कडवट भावना नाही आणि ते एकमेकांसाठी आनंदी आहेत.
हे ही वाचा- अदनान सामीचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल आश्चर्यचकीत; Photo वर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट
दीपिका आणि रणबीरचं ब्रेकअप बरंच गाजलं होतं. आता दोघेही आपापल्या पार्टनरसोबत खूपच आनंदी आहेत. दीपिकाने 2019 मध्ये रणवीर सिंगसोबत विवाह केला तर रणबीरने नुकतंच आलिया भट्टशी एप्रिल महिन्यात लग्न केलं. ब्रेकअपनंतर सुद्धा पार्टीच्या निमित्ताने दोघे अनेकदा सोबत दिसले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Advertisement, Breakup, Couple, Deepika padukone, Ranbir kapoor