Birthday Special : रणबीरचे VIRAL PHOTO ठरले वादग्रस्त, बॉलिवूडमध्ये उडाली होती खळबळ

Birthday Special : रणबीरचे VIRAL PHOTO ठरले वादग्रस्त, बॉलिवूडमध्ये उडाली होती खळबळ

रणबीर कपूरच्या फिल्मी करिअर पेक्षा त्याचं खासगी जीवनच जास्त चर्चेत आणि वादग्रस्त राहिलं.

  • Share this:

मुंबई, 28 सप्टेंबर : बॉलिवूडचा चॉकलेट हिरो रणबीर कपूर आज 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2007 मध्ये सावरिया सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या रणबीरचा पहिला सिनेमा फ्लॉप ठरला असला तरी त्यानंतर मात्र त्यानं अनेक हिट सिनेमा दिले. त्याच्या अनेक सिनेमांसाठी त्याला पुरस्कार सुद्धा मिळाले. मात्र त्याच्या फिल्मी करिअर पेक्षा त्याचं खासगी जीवन अतिशय वादग्रस्त राहिलं. कधी कोणत्या सीनमुळे तर कधी बॉलिवूड अभिनेत्रीशी अफेअर. अनेक वेगवेगळ्या कारणांनी रणबीर वादात अडकला होता. मात्र त्याचे काही असे व्हायरल फोटो ज्यांनी बॉलवूडमध्ये खळबळ माजली होती.

रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचं अफेअर खूप गाजलं. या दोघांच्या नात्याला कपूर कुटुंबीयांनीही मान्यता दिली. कतरिना अनेकदा कपूर कुटुंबीयाच्या फंक्शनमध्ये सुद्धा दिसली. लवकरच हे दोघंही लग्नाच्या बेडीत अडकतील असं म्हटलं जात असताना अचानक या दोघांच्या व्हायरल झालेल्या काही फोटोंमुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला. एका  बीचवरील रणबीर आणि कतरिनाचे हे फोटो व्हायरल झाल्यानं बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. ही गोष्ट कपूर कुटुंबीयांना रुचली नाही आणि रणबीरनं कतरिनाशी नातं तोडलं.

...म्हणून अभिनेता अक्षय कुमार चंबळच्या खोऱ्यातल्या डाकूच्या निशाण्यावर

हे फोटो रणबीर आणि कतरिनाच्या नकळत घेतले गेले होते. त्यानंतर ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि एकच खळबळ उडाली. या फोटोमध्ये कतरिना रेड आणि व्हाइट कलरच्या बिकिनी मध्ये दिसली होती.  हे फोटो जर अशाप्रकारे व्हायरल झाले नसते तर कदाचित कतरिना आज कपूर कुटुंबीयांची सून असती.

लोकांचं भविष्य सांगणाऱ्या जोतिष्याची पोलखोल, 10 हजाराच्या प्रश्नावर शोमधून बाहेर

यानंतर अभिनेत्री माहिरा खान सोबत रणबीरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायर झाले होते. ज्यामध्ये हे दोघंही स्मोकिंग करताना दिसत होते. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर या दोघांवर जबरदस्त टीका झाली होती. हा फोटो न्यूयॉर्कमधील एका रेस्टॉरंटच्या बाहेरचा असल्याचं बोललं जात होतं. यानंतर माहिरा खाननं लोकांना सडेतोड उत्तरही दिलं होतं मात्र रणबीरचा हा फोटो प्रंचंड वादग्रस्त ठरला होता.

याशिवाय रणबीरचा आणखी एक फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो संजू सिनेमाच्या सेटवरून लीक झाला होता. ज्यात रणबीर हुबेहूब संजय दत्त सारखा दिसत होता. रणबीरचा हा लुक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. या सिनेमासाठी रणबीरनं प्रचंड मेहनत घेतली होती. या सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता.

Houseful 4 Trailer : अक्षय कुमारच्या तुफान कॉमेडीला हॉररचा तडका!

==================================================================

SPECIAL REPORT: शत्रूसोबत दोन हात करणारं भारतीय नौदल आता आणखी बळकट होणार!

First published: September 28, 2019, 9:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading