...म्हणून अभिनेता अक्षय कुमार चंबळच्या खोऱ्यातल्या डाकूच्या निशाण्यावर

...म्हणून अभिनेता अक्षय कुमार चंबळच्या खोऱ्यातल्या डाकूच्या निशाण्यावर

एकेकाळी दहशतीचं दुसरं नाव म्हणून ओळखला जाणारा हा डाकू काही वर्षं तुरुंगवास भोगल्यानंतर आता सामान्य जीवन जगत आहे.

  • Share this:

मुंबई, 27 सप्टेंबर : सध्या बॉलिवूडमध्ये एतिहासिक सिनेमांचा ट्रेंड सुरू आहे. मात्र हे सर्वच सिनेमा नेहमी कट्टर धार्मिक संघटनांमुळे चर्चेत राहतात. असंच काहीसं झालं आहे, यशराज फिल्मच्या बॅनरखाली महान राजा पृथ्वीराज चौहान यांच्यावर तयार होत असलेल्या सिनेमासोबत. या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार प्रमुख भूमिका साकारत आहे. अशातच पूर्वाश्रमीचा डाकू मलखान सिंहनं अक्षय कुमारला या सिनेमात तथ्य तोडून मोडून भ्रामक तथ्य जोडल्यास या सिनेमाला आम्ही विरोध करु असा इशारा दिला आहे.

मलखान सिंहचा इशारा...

ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित असलेला 'पृथ्वीराज चौहान' या सिनेमाला याआधी करणी सेनेनंही धमकी दिली होती. त्यानंतर आता पूर्वश्रमीचा डाकू या सिनेमासंबंधी अक्षय कुमारला इशारा दिला आहे. एकेकाळी बीहड़ मध्ये दहशतीचं दुसरं नाव म्हणून मलखान सिंहचं नाव घेतलं जात असे. या सिनेमाबाबत मलखान सिंहचं म्हणणं आहे की, अनेक ऐतिहासिक सिनेमात पैसा कमावण्याच्या हेतूनं मूळ तथ्य तोडून मोडून प्रेक्षकांसमोर मांडलं जातं. त्यामुळे या राजा-महाराजाचा मूळ एतिहास बदलतो. त्यामुळे हा सिनेमा तयार करताना असं काही करण्यात येऊ नये असा इशारा त्यानं अक्षय कुमारला दिला आहे.

Houseful 4 Trailer : अक्षय कुमारच्या तुफान कॉमेडीला हॉररचा तडका!

मलखानचं असही म्हणणं आहे की, 'पृथ्वीराज चौहानबद्दल देशभरातील लोकांच्या मनात प्रचंड आस्था आणि सन्मान आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल संभ्रमित करणारी तथ्य हा सिनेमा तयार करताना जोडली गेली तर हे सहन केलं जाणार नाही. जर असं झालं तर या सिनेमाला आमचा पूर्ण विरोध असेल.' यशराज बॅनरखाली सध्या पृथ्वीराज चौहान या सिनेमाची भव्य निर्मिती केली जात आहे. हा सिनेमा 2020 मध्ये दिवाळीच्या शुभमुहूर्तावर रिलीज होणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार पृथ्वीराज चौहानची भूमिका साकारत आहे.

KBC-11: मुंबईतील शिक्षिका देऊ शकली नाही तिसरीच्या अभ्यासक्रमातील प्रश्नाचं उत्तर

एकेकाळी होती मलखान सिंहची दहशत

मलखान सिंह मूळचा भिंड जिल्ह्यातील राहणारा आहे. 1970 मध्ये मलखान सिंहला दहशतीचं दुसरं नाव म्हणून ओळखलं जात असे. त्यावेळी मलखान सिंह एमपी, युपी आणि राजस्थानमधील सर्व पोलिसांसाठी मोठं आव्हान होऊन बसला होता. अनेक प्रयत्न करूनही पोलिस त्याला पकडू शकले नव्हते किंवा त्याचा एन्काउंटर करु शकले नव्हते. 1982मध्ये त्यावेळचे मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांच्यासमोर मलखाननं त्याच्या गँगसह आत्मसमर्पण केलं. त्यावेळी त्याच्यावर हत्या आणि अपहरणाच्या अनेक केस दाखल करण्यात आल्या होत्या. काही वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेनंतर मलखान सिंह सध्या सामान्य जीवन जगत आहे.

बॉयफ्रेंडसोबत BOLD अवतारात दिसली जॅकी श्रॉफची लेक, PHOTO VIRAL

===================================================================

SPECIAL REPORT: शत्रूसोबत दोन हात करणारं भारतीय नौदल आता आणखी बळकट होणार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 04:45 PM IST

ताज्या बातम्या