KBC-11 : लोकांचं भविष्य सांगणाऱ्या जोतिष्याची पोलखोल, 10 हजारांच्या प्रश्नावर शोमधून बाहेर

KBC-11 : लोकांचं भविष्य सांगणाऱ्या जोतिष्याची पोलखोल, 10 हजारांच्या प्रश्नावर शोमधून बाहेर

लोकांचं भविष्य सांगणाऱ्या या जोतिष्यासोबत जे काही घडलं त्यावरुन सर्वांनीच शिकवण घ्यावी.

  • Share this:

मुंबई, 27 सप्टेंबर : 'कौन बनेगा करोडपती' या शो सध्या टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो ठरत आहे. प्रत्येक एपिसोडनंतर नवे खुलासे समोर येत आहेत. तर वेगवेगळे स्पर्धक वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहत आहेत. मात्र नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसेडमध्ये असं काही घडलं ज्यामुळे सर्वांचेच डोळे उघडतील. लोकांचं भविष्य सांगणाऱ्या या जोतिष्यासोबत जे काही घडलं त्यावरुन सर्वांनीच शिकवण घ्यावी.

21 व्या शतकात जगत असताना आज अनेकांना जोतिष्यांकडे आपलं भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता असते. मात्र केबीसीच्या 11 व्या सीझनमध्ये एका जोतिष्यानं भाग घेतल्यानंतर त्यानं ज्याप्रकारे प्रश्नांची उत्तर दिली त्यावरून जोतिष शास्त्र आणि जोतिष्यांवरुन सर्वांचा विश्वास उडेल.

KBC-11: मुंबईतील शिक्षिका देऊ शकली नाही तिसरीच्या अभ्यासक्रमातील प्रश्नाचं उत्तर

बुधवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर पंडित हरिओम शर्मा बसले होते. ते गुरुवारी पहिल्याच प्रश्नावर खेळ थांबवत शोमधून बाहेर पडले. त्यांच्याकडे 3 लाइफलाइन असतानाही त्यांनी प्रश्नाचं उत्तरच चुकीचं दिल्यानं या शोमधून बाहेर पडले.

बॉयफ्रेंडसोबत BOLD अवतारात दिसली जॅकी श्रॉफची लेक, PHOTO VIRAL

या प्रश्नावर पडले बाहेर

20 जुलैला मानवी इतिहासातील कोणत्या घटनेचा 50 वा वर्धापन दिवस साजरा केला गेला. हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता मात्र पंडित हरिओम शर्मांनी या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिल्यानं ते या खेळातून बाहेर पडले

याआधी अमिताभ बच्चन यांनी पंडित हरिओम शर्मांना विचारलं, आम्ही ऐकलं आहे, धर्म आणि वेदाचं शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही जोतिष्य शास्त्रही जाणता. त्यावर ते म्हणाले, भागवत, रामकथा, यज्ञ अनुष्ठान आणि जोतिष हे माझं काम आहे. त्यावर अमिताभ विचारतात, तुम्हाला माहित आहे का तुमचं आजच्या दिवसाचं भविष्य काय आहे. बिग बींच्या या प्रश्नावर सर्वच हसू लागतात.

बिग बी अमिताभ बच्चन यांना झालाय 'हा' गंभीर आजार, KBC-11 मध्ये केला खुलासा

अमिताभ यांच्या या प्रश्नावर जोतिषी सांगतात, मला आधीच माहित होत की, मी हॉट सीटवर बसणार आहे आणि माझी ही भविष्यवाणी खरी झाली. दरम्यान जोतिषी आणि अमिताभ बच्चन यांच्यात अनेक श्लोकांची जुगलबंदी रंगली. या एपिसोडचा प्रोमो पाहिल्यावर हा शो इंटरेस्टिंग होणार असं वाटत होतं मात्र जोतिष्यांच्या खराब प्रदर्शनानंतर लोकांचा हिरमोड झाला.

============================================================

SPECIAL REPORT: शत्रूसोबत दोन हात करणारं भारतीय नौदल आता आणखी बळकट होणार!

First published: September 27, 2019, 3:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading