मुंबई, 24 ऑगस्ट : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे बॉलिवूडमधील कपल सध्या प्रचंड चर्चेत आहे. या दोघांचा ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्याआधीच हे दोघे वादाच्या भोवऱ्यात अडकत आहेत. ह्या दोघांच्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण होत आहेत. आलिया भट्ट तिने बॉलिवूडच्या बॉयकॉट संस्कृतीवर केलेल्या व्य्कत्वामुळे वादात अडकली होती. पण मध्यंतरी रणबीर कपूरही वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला होता. त्या वक्तव्यासाठी त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती. पण आता त्याने पुढाकार घेत माफी मागितली आहे. रणबीर कपूर सध्या त्याची पत्नी आलिया भट्टवर केलेल्या कमेंटमुळे तुफान चर्चेत आहे. यूट्यूबवर लाइव्ह चर्चेदरम्यान, रणबीरने आलियाला तिच्या बेबी बंपकडे पाहताना तिच्या वाढलेल्या वजनावर कमेंट केली होती. आलिया भट्ट तिच्या प्रेग्नंसी मुळे चर्चेत आहे. तिचा बेबी बम्पही स्पष्ट दिसून येतोय. तसेच गरोदरपणात तिचं वजनही वाढत आहे. तिच्या वजनावर रणबीर कपूरने तिला ‘फेलोड’ म्हणत तिची मस्करी केली होती. पण आलियाच्या फॅन्सना त्याचं हे वागणं काही पसंतीस उतरलं नव्हतं. आणि त्यांनी रणबीरवर टीका करण्यास सुरुवात केली होती. हेही वाचा - Alia Bhatt: बॉयकॉटच्या वादात आलियाची उडी; पण आता करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना पण आज बुधवारी रणबीरने त्याच्या या वक्तव्याबद्दल सर्वांसमोर जाहीर माफी मागितली आहे. रणबीर सध्या चेन्नईमध्ये एसएस राजामौली आणि नागार्जुनसोबत ‘ब्रम्हास्त्र’चे प्रमोशन करत आहे. तेथील माध्यमांशी बोलताना त्यांनी अखेर या वादावर प्रतिक्रिया दिली.मीडिया संवादादरम्यान, रणबीरला विचारण्यात आले की लोक त्याच्यावर नाराज असल्याने त्याला त्याची काही बाजू मांडायची आहे का, त्यावर त्याने त्वरीत माफी मागितली.
रणबीर म्हणाला, ‘आलिया माझं सर्वस्व आहे. तिला मी काही वाईट बोलू शकत नाही. पण त्यावेळी मी एक विनोद केला होता. आणि तो जोक म्हणून ग्राह्य धरला नाही. मला माहित आहे माझी विनोदबुद्धी वाईट आहे. माझ्या बोलण्यामुळे ज्यांना जॅन वाईट वाटले आहे त्या सगळ्यांची मी माफी मागतो.’ आलिया आणि रणबीर लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. या वर्षी एप्रिलमध्ये त्यांचे लग्न झाले. वर्क फ्रंटवर, ही जोडी पहिल्यांदाच ‘ब्रह्मास्त्र’मध्ये स्क्रीन स्पेस शेअर करताना एकत्र दिसणार आहे. यात अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.