मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'भावा कतरिनाची काळजी घ्ये'; विकी कौशल-रणबीर कपूरच्या व्हायरल फोटोवर नेटकऱ्याची भन्नाट कमेंट

'भावा कतरिनाची काळजी घ्ये'; विकी कौशल-रणबीर कपूरच्या व्हायरल फोटोवर नेटकऱ्याची भन्नाट कमेंट

विकी कौशल आणि रणबीर कपूरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट येत आहेत.

विकी कौशल आणि रणबीर कपूरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट येत आहेत.

विकी कौशल आणि रणबीर कपूरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट येत आहेत.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 28 नोव्हेंबर - सध्या बॉलिवूडमध्ये (Bollywood) लगीनघाई जोरात आहे. अलीकडेच अनेक स्टार्सनी लग्नगाठ बांधली असून अनेकांनी सात फेरे घेण्याची तयारी केली आहे. बॉलीवूडच्या सध्याच्या काळातील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अतिशय सुंदर अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) पुढील महिन्यात 9 डिसेंबर रोजी लग्न करणार असल्याची चर्चा आहे.यासोबतच अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) देखील लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. बॉलिवूडच्या या स्टार्सच्या लग्नाची चर्चा असताना विकी कौशल आणि रणबीर कपूरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर या फोटोवर यूजर्स मजेशीर कमेंट करत आहेत

पापाराझी व्हायरल भयानीने त्याच्या अधिकृत इन्स्टावर विकी कौशल आणि रणबीर कपूरचे (Vicky Kaushal & Ranbir Kapoor) काही फोटो पोस्ट केले आहेत. दोन्ही स्टार्स एकमेकांशी हसत हसत बोलत असल्याचे तुम्ही या फोटोंमध्ये पाहू शकता. विकी-रणबीरच्या या फोटोंमुळे सोशल मीडिया यूजर्सना बसल्या बसल्या कमेंट्स करण्याची संधी चालून आली आहे. एका यूजरने कमेंट केली आहे की, 'दोघेही एकमेकांना लग्नाबद्दल अभिनंदन करत आहेत.' तर एका चाहत्याने 'विकी टू रणबीर - भावा कतरिनाची काळजी घ्ये' अशी खिल्ली उडवली. एका युजरने एक पाऊल पुढे जाऊन कमेंट केली आहे, मेरी एक्स, तेरी बीवी है, हाऊ द जोश.' अशा अनेक मजेशीर कमेंट्स युजर्सकडून दोघांच्या फोटोंवर केल्या येत आहेत.

ranbir and vicky kaushal

9 डिसेंबरला होणार कॅट-विकीचं लग्न!

विकी-कतरिना 9 डिसेंबरला सिक्स सेन्स फोर्ट, बरवारा, राजस्थान येथे लग्न करणार असल्याची माहिती आहे. तर 7 आणि 8 डिसेंबरला एंगेजमेंट, मेहंदी आणि संगीत समारंभ होणार आहेत. या लग्नाला बॉलिवूडचे अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या लग्नाला फराह खान, करण जोहर, झोया अख्तर आणि शशांक खेतान यांसारख्या चित्रपटातील व्यक्ती हजेरी लावू शकतात.

वाचा: VIDEO : उर्वशी रौतेलाने सोलमेटबद्दल खुलासा करताच चाहत्यांना झाली 'या' क्रिकेटरची आठवण

याआधी अशा बातम्या येत होत्या की, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील या वर्षाच्या अखेरीस लग्न करणार आहेत. पण आता दोन्ही स्टार्स पुढील वर्षी सात फेरे घेणार असल्याच्या बातम्या येत आहेत. सध्या रणवीर आणि आलिया आपापल्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहेत.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Katrina kaif, Ranbir kapoor, Vicky kaushal