• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • रणबीर-आलिया डिसेंबरमध्ये बांधणार लग्नगाठ? इटलीमध्ये पार पडणार सोहळा!

रणबीर-आलिया डिसेंबरमध्ये बांधणार लग्नगाठ? इटलीमध्ये पार पडणार सोहळा!

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या चर्चेदरम्यान बी-टाऊनचे हिट कपल आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर(Ranbir Kapoor) यांच्या लग्नाच्या बातम्यांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.

 • Share this:
  मुंबई,27ऑक्टोबर- लग्नसराई (Wedding Season) सुरू झाली आहे. लग्नाचा हा सीझन सुरू होताच बॉलिवूडमधील लव्ह बर्ड्सची चांगलीच चर्चा रंगली आहे. बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या चर्चेदरम्यान बी-टाऊनचे हिट कपल आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर(Ranbir Kapoor) यांच्या लग्नाच्या बातम्यांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.दोघांच्या लग्नाबाबत अशा बातम्या समोर येत आहेत, हे दोघांचे चाहते खूप उत्सुक होणार आहेत. आलिया-रणबीरचे लग्न बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा भाग आहे.
  नीतू कपूर लवकरच आलिया भट्टला नववधूच्या रुपात आपल्या घरात आणणार आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चाहते खूप उत्सुक आहेत. गेल्या वर्षीही आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाबाबत बातम्या आल्या होत्या, मात्र कोरोनामुळे त्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागला होता.असं म्हटलं जातं. आता अशी बातमी आहे की, कतरिना कैफ आणि विकी कौशलप्रमाणे हे कपलही या वर्षी डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. (हे वाचा:कतरिना-विकी करतायेत लग्नाची तयारी? 'या'ठिकाणी दिसले एकत्र, जाणून घ्या सर्व डिटेल) 'अॅनिमल'चे शूटिंग पुढे ढकलले- मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया आणि रणबीर दीर्घ प्रतीक्षेनंतर यावर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. वास्तविक, अशी बातमी आहे की, 'ब्रह्मास्त्र' नंतर रणबीर कपूर त्याच्या आगामी 'अॅनिमल' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार होता. परंतु त्यांनी त्याचे वेळापत्रक जानेवारी २०२२ पर्यंत पुढे ढकललं आहे. या चित्रपटात रणबीरसोबत परिणीती चोप्रा, अनिल कपूर, बॉबी देओल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आलिया भट्ट नवीन वर्षानंतर करणार काम- त्याच वेळी, आलिया भट्टबद्दल बातम्या आहेत की ती देखील ऑक्टोबरपर्यंत तिच्या सर्व असाइनमेंट पूर्ण करेल. आणि नोव्हेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ती स्वत: ला फ्री ठेवणार आहे. (हे वाचा: Shweta Tiwari ने लेकीच्या पहिल्या म्युझिक व्हिडीओचा First Look केला शेअर... ) अनुष्का-विराटप्रमाणे करणार लग्न- क्रिकेटर विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माप्रमाणे आलिया-रणबीर इटलीत लग्नगाठ बांधणार असल्याचंही बोललं जात आहे. आलिया-रणबीरच्या लग्नाला फार कमी लोक उपस्थित राहणार असल्याचं समोर येत आहे. त्यात दोन्ही कुटुंबातील काही लोकांची आणि काही खास मित्रांची नावे असणार आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published: