मुंबई, 27ऑक्टोबर- बॉलिवूड(Bollywood) अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या त्याच्या 'सरदार उधम' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. मात्र, विकी केवळ त्याच्या अभिनयामुळेच नाही तर कतरिना कैफसोबतच्या लग्नाच्या अफवांमुळेही चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना(Katrina Kaif) आणि विकी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. हे जोडपं लवकरच त्यांच्या नात्याला एक पाऊल पुढं नेण्यासाठी तयार आहेत.
View this post on Instagram
ETimes ने एका जवळच्या स्त्रोताचा हवाला देत सांगितलं की, तिच्या लग्नाचा ड्रेस सब्यसाची डिझाइन करत आहे. सध्या ती तिचा ड्रेस निवडण्याच्या प्रक्रियेत आहे. कतरिनाने तिच्या ड्रेससाठी सिल्कची निवड केली आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लग्न होणार असल्याचं म्हटलं जात आहे. आता कतरिना कैफ आणि विकी कौशल रेश्मा शेट्टीच्या ऑफिसमध्ये स्पॉट झाले आहेत. दोघेही आपापल्या कारमधून तिथे पोहोचले होते.विरल भयानीने हि पोस्ट शेअर केली आहे.
(हे वाचा:Sardar Udham Singh: विकी-कतरिना आणि कियारा-सिद्धार्थ पोहोचले ... )
कतरिना कैफ विकी कौशलला डेट करत असल्याच्या अफवा 2018 मध्ये सुरू झाल्या होत्या. 'कॉफी विथ करण' या प्रसिद्ध चॅट शोच्या सीझन 6 मध्ये कतरिना कैफने अभिनेता विकी कौशलसोबत रुपेरी पडद्यावर चांगली दिसणार असल्याचं उघडपणे सांगितलं होतं.कतरिना कैफ 'टायगर 3' च्या शूटसाठी निघण्यापूर्वी या जोडप्याच्या रोका सेरेमनीच्या बातमीने चाहत्यांना आनंद झाला होता. तथापि, कतरिनाच्या टीमने पुष्टी केली की या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही.
(हे वाचा:कतरिनासोबत साखरपुड्याच्या अफवांवर अशी होती विकीच्या आई-वडिलांची ... )
अलीकडेच, दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले होते जेव्हा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला होता, जो विकीच्या 'सरदार उधम' चित्रपटाच्या प्रदर्शनाशी संबंधित होता. त्या व्हायरल व्हिडिओमध्ये विकी आणि कतरिना एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal