मुंबई,27ऑक्टोबर- लोकप्रिय चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची(Shweta Tiwari) मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'रोजी: द सेफ्रॉन चॅप्टर' हा चित्रपट 14 जानेवारी 2022 रोजी मकर संक्रांतीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. दरम्यान, पलक तिवारीची आई श्वेता तिवारीने तिच्या पुढील प्रोजेक्टबद्दल सांगून चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. श्वेतानं सांगितलं की, पलक लवकरच एका नवीन म्युझिक व्हिडिओमध्ये(Music Video) दिसणार आहे.
श्वेता तिवारीने इन्स्टाग्रामवर पलकच्या म्युझिक व्हिडिओची पहिली झलक चाहत्यांशी शेअर केली आहे. यासोबतच श्वेतानं सांगितलं की, तिला एक आई म्हणून अभिमान वाटत आहे. तिच्या पोस्टमध्ये, श्वेताने पलकच्या म्युझिक व्हिडिओची रिलीज डेट देखील उघड केली आहे. या महिन्यात 30 ऑक्टोबर रोजी हा व्हिडीओ अल्बम रिलीज होणार आहे. आपल्या मुलीचं हे मोठं यश पाहून श्वेताचा आनंद गगनात मावत नाहीय.
(हे वाचा:मुलीच्या इंटीमेट सीनबद्दल आई श्वेता तिवारीची अशी आहे प्रतिक्रिया )
श्वेताने तिच्या मुलीचा फर्स्ट लूक शेअर करत लिहिलं की, हा व्हिडिओ खरोखर येणार आहे यावर विश्वास बसत नाही. पलक तिवारीच्या या आगामी व्हिडिओचं नाव 'बिजली-बिजली' आहे.
View this post on Instagram
पोस्टसोबतच श्वेता तिवारीने मुलगी पलक तिवारीचा एक ग्लॅमरस फोटोही शेअर केला आहे. ते शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'गर्वाचा क्षण. अरे देवा. तिच्या पहिल्या म्युझिक व्हिडिओमधून @palaktiwarii चा हा फर्स्ट लूक प्रकट करण्याची अखेर वेळ आली आहे. @harrdysandhu चा 'बिजली बिजली' 30 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.महान दिग्दर्शक @arvindrkhaira सोबत काम करणं, कोणीतरी @jaani777 ने लिहिलेल्या गाण्यावर परफॉर्म करणं आणि @bpraak संगीतासोबत काम करणं हे स्वप्नापेक्षा कमी नव्हतं.'' श्वेताची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
(हे वाचा:Genelia Deshmukh ने घातला एवढा शॉर्ट ड्रेस की, सारखा खाली करताना आले नाकी नऊ)
दुसरीकडे, पलक तिवारीच्या डेब्यू प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर, विवेक ओबेरॉयचा ओबेरॉय मेगा एंटरटेनमेंट, मंदिरा एंटरटेनमेंट आणि प्रेरणा व्ही अरोरा मिळून या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. विशाल रंजन मिश्रा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात अरबाज खान देखील दिसू शकतो. पलक 'रोजी: द सॅफ्रोन चॅप्टर''या प्रोजेक्टसाठी खूप उत्सुक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Shweta tiwari