मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'ते स्वस्थ आणि सुरक्षित आहेत', रामायण फेम अरविंद त्रिवेदी आणि गायक लकी अली यांच्या निधनाच्या अफवांवर स्पष्टीकरण

'ते स्वस्थ आणि सुरक्षित आहेत', रामायण फेम अरविंद त्रिवेदी आणि गायक लकी अली यांच्या निधनाच्या अफवांवर स्पष्टीकरण

रामायण या लोकप्रिय मालितकेतील रावण म्हणजेच अभिनेते अरविंद त्रिवेदी (Arvind Trivedi) तसंच प्रसिद्ध गायक लकी अली (Lucky Ali) यांच्या निधनाची बातमी नुकतीच सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

रामायण या लोकप्रिय मालितकेतील रावण म्हणजेच अभिनेते अरविंद त्रिवेदी (Arvind Trivedi) तसंच प्रसिद्ध गायक लकी अली (Lucky Ali) यांच्या निधनाची बातमी नुकतीच सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

रामायण या लोकप्रिय मालितकेतील रावण म्हणजेच अभिनेते अरविंद त्रिवेदी (Arvind Trivedi) तसंच प्रसिद्ध गायक लकी अली (Lucky Ali) यांच्या निधनाची बातमी नुकतीच सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

मुंबई 5 मे: सध्या देशभर कोरोनाने थैमान (corona virus pandemic) घातलं आहे. याशिवाय अनेक वाईट बातम्याही ऐकायला मिळत आहेत. अनेकांचे प्रियजन त्यांना सोडून गेले. तर अनेक सेलिब्रिटी कलाकारंनीही काळात जगाचा निरोप घेतला. अशातच काही कलाकारंच्या निधनाच्या अफवाही पसरत आहेत. रामायण या लोकप्रिय मालितकेतील रावण म्हणजेच अभिनेते अरविंद त्रिवेदी (Arvind Trivedi) तसंच प्रसिद्ध गायक लकी अली (Lucky Ali) यांच्या निधनाची बातमी नुकतीच सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

अभिनेते अरविंद त्रिवेदी य़ांच्या निधनाची बातमी आल्यानंतर रामायण मालिकेतील लक्ष्मण ही भूमिका साकारणारे सुनील लहरी (Sunil Lahiri) यांनी या बातमीची खुलासा करत ही एक अफवा असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणतात, ‘कोरोनामुळे आजकाल कोणती ना कोणती वाईट गोष्ट ऐकायला मिळत आहे. त्यातच ही अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाची बातमी, खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना माझी विनंती आहे की कृपया अशा प्रकारच्या बातम्या पसरवू नका.... देवाच्या कृपेने अरविंद जी ठिक आहेत. मी प्रार्थना करतो की त्यांना उत्तम स्वास्थ्य लाभो.’

View this post on Instagram

A post shared by Sunil Lahri (@sunil_lahri)

यानंतर आणखी एक खोटी बातमी पसरली ती प्रसिद्ध गायक लकी अली यांच्या निधनाची. मंगळवारी अचानक सोशल मीडियावर लकी अली यांच्या निधनाची बातमी आल्याने अनेकजन हैराण झाले होते. पण आता ही बातमी खोटी असल्याच समोर आल्याने अनेकांनी सुटकोचा निश्वास सोडला आहे.

मसाले कुटल्यानंतर राधिकाचा ठसकेबाज विनोद, 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर अनिताची धमाकेदार एन्ट्री

लकी यांची मैत्रिण नासिफा अली सोढी यांनी ट्विटरवर ट्वीट करत बातमी खोटी असल्याचं म्हटलं आहे. ट्वीटमध्ये त्या म्हणतात, लकी अली पूर्णपणे ठिक आहेत. आजच दुपारी आमचं बोलणं झालं. ते आपल्या कुटुंबासोबत फार्मवर आहे. त्यांना कोरोना झाला नाही. ते पूर्णपणे स्वस्थ आणि सुरक्षित आहेत.

याआधीही काही कलाकारंच्या आणि सेलिब्रिटीजच्या निधनाच्या अफवा आल्या होत्या. नुकतंच एकेकाळची बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री (Meenakshi Sheshadri)  यांच्याही निधनाची खोटी बातमी पसरली होती. त्यामुळे अशा अफवांपासून दूर राहणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Bollywood News, Death, Entertainment, Rumors