मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /मसाले कुटल्यानंतर राधिकाचा ठसकेबाज विनोद, 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर अनिताची धमाकेदार एन्ट्री

मसाले कुटल्यानंतर राधिकाचा ठसकेबाज विनोद, 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर अनिताची धमाकेदार एन्ट्री

झी मराठी वरील सगळ्यांची लाडकी राधिका म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते - केळकर (Anita Date – Kelkar) विनोद करताना पाहायला मिळणार आहे.

झी मराठी वरील सगळ्यांची लाडकी राधिका म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते - केळकर (Anita Date – Kelkar) विनोद करताना पाहायला मिळणार आहे.

झी मराठी वरील सगळ्यांची लाडकी राधिका म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते - केळकर (Anita Date – Kelkar) विनोद करताना पाहायला मिळणार आहे.

मुंबई 5 मे: झी मराठी (Zee Marathi) वरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya)  नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवत आला आहे. मुख्य कलाकरांसह नेहमीच वेगवेगळ्या कलाकारांची उपस्थिती आणि विनोद पाहायला मिळतात. तर आता झी मराठी वरील सगळ्यांची लाडकी राधिका म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते - केळकर (Anita Date – Kelkar) विनोद करताना पाहायला मिळणार आहे.

झी मराठीवर अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Mazhya Navryachi Bayko) या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. पण आजही प्रेक्षक अनिताला राधिका म्हणून ओळखतात. राधिका हे पात्र विशेष लोकप्रिय झालं होतं. एक साधी गृहीनी ते उद्योजिका, एक सक्षम स्त्री असा तिचा प्रवास दाखवण्यात आला होता. पण आता ती विनोदी भूमिकेत दिसणार असल्याने प्रेक्षकांचीही उत्सुकता वाढली आहे.

याआधीही ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये मुख्य कलाकार भाऊ कदम, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपूरे, अंकूर वाढवे यांच्या व्यतिरिक्त शिवानी बावकर, गायत्री दातार, स्नेहा शिदम या अभिनेत्री विनोद करताना दिसल्या होत्या. तर आता अनिता देखिल या नव्या रुपात दिसणार आहे.

Cuteness Overload! अमृता खानविलकरने शेअर केलेला या छोटू 'टेडी बेअर'चा VIDEO पाहून काय म्हणाल?

अनिताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शोअर केला आहे. ज्यात ती गायत्री दातार सोबत मंच्याच्या मागे वेळ घालवताना दिसत आहे. तसेच ‘चला हवा येऊ द्या’च्या या आठवड्यात अभिनेता स्वप्नील जोशीने (Swapnil Joshi)  राजकारण, वाढता करोनाचा प्रादुर्भाव आणि ऑक्सिजन यावर भाष्य करणाऱ्या पत्राचं वाचन केलं होतं, तेव्हा तेथे उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले होते. सध्याच्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीमुळे राज्यातील चित्रिकरण बंद असल्याने चला हवा येऊ द्याचं बस्तान देखिल राज्याबाहेर जयपूर मध्ये हलवण्यात आलं आहे.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Tv serial, Zee marathi serial