मुंबई, 16 एप्रिल : अभिनेत्री सुश्मिता सेन आज बॉलिवूडच्या काही यशस्वी अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. ती एक सिंगल मदर आहे. सुश्मितानं अद्याप लग्न केलेलं नाही मात्र तिनं 2 मुलींना दत्तक घेतलं आहे. 1994 मध्ये सुश्मिता मिस इंडिया झाली. मात्र या स्पर्धेची तयारी करण्यापासून ही स्पर्धा जिंकण्यापर्यंत सुश्मिताचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. खास करुन या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेच्या वेळी तिनं घातलेला गाऊन. या गाऊनची एक वेगळीच कहाणी आहे. सध्या सोशल मीडियावर सुश्मिताचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तिनं हा गाऊन कसा तयार केला गेला याची कहाणी सांगितली आहे.
सुश्मितानं 1994मध्ये ज्यावेळी मिस इंडिया स्पर्धेसाठी तयारी सुरू केली त्यावेळी तिला माहित नव्हतं की या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेसाठी तिला एका महागड्या ड्रेसची गरज आहे हे तिला माहिती नव्हतं. फक्त ही स्पर्धा जिंकायची एवढंच तिच्या डोक्यात होतं. पण जेव्हा तिला समजलं की या स्पर्धेत प्रत्येक मॉडेलला 4 ड्रेस घालायचे आहेत. तेव्हा तिनं कपड्यासाठी वेगळीच शकल लढवली होती. कारण सुश्मिताकडे ग्रँड फिनालेसाठी घालण्यासाठी ड्रेसच नव्हता.
'जबन छोरी'मध्ये दिसला सपना चौधरीचा BOLD अंदाज, तुफान फिरतोय VIDEO
सुश्मिता सांगते, माझ्याकडे एवढे पैसे नव्हते की मी डिझायनर कपडे घालून परफॉर्म करु, ना माझ्याकडे तसे काही कपडे होते. मी एका मध्यमवर्गीय घरातील मुलगी होते आणि मला माझ्या मर्यादा माहित होत्या. पण आई म्हणली, कपडे नाही तर काय झालं, लोक कपडे बघायला थोडंच येणार आहेत. ते तर तुला बघायला येणार आहेत. चल शॉपिंग करुन येऊ. आम्ही सरोजिनी मार्केटला गेलो आणि तिथून लांबलचक कपडा घेऊन आलो.
सुश्मिता पुढे सांगते, आमच्या गॅरेजजवळ एक टेलर होता. आम्ही तो कपडा घेऊन त्याच्याकडे गेलो आणि त्याला म्हटलं, हे सर्व टीव्हीवर दिसणार आहे. तर चांगले कपडे शिवून द्या. अशाप्रकारे माझा विनिंग गाऊन तयार झाला. आईनं उरलेल्या कापडाचे गुलाब बनवून माझ्या खांद्यावर लावले आमि ब्लॅक कलरचे सॉक्स घेऊन ते कट करुन माझे ग्लव्स बनवण्यात आले. माझ्यासाठी ते दिवस खूप महत्त्वाचे आहेत. ते कपडे घालून मी मिस इंडिया झाले आणि त्यावेळी मला एक गोष्ट समजली की व्यक्तीचे कपडे नाही तर विचार चांगले असणं सर्वात महत्त्वाचं आहे.
शिल्पा शेट्टीचं '15' या अंकाशी आहे खास कनेक्शन, Video शेअर करुन सांगितलं सिक्रेट
सुश्मिता सेन सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र ती लवकरच वेब सीरिज माध्यमातून पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. याशिवाय बऱ्याच काळापासून ती बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. ती नेहमीच त्याच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत असते. रोहमनचं सुश्मिताच्या दोन्ही मुलींशी खूप चांगलं बॉन्डिंग पाहायला मिळतं. लवकरच हे दोघं लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे.
(संपादन : मेघा जेठे.)
दारू प्यायल्यानं कोरोना मरतो का? कार्तिकच्या प्रश्नावर काय म्हणाल्या डॉक्टर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Sushmita sen