लारा दत्तानं पती महेश भूपतीची अनेक वर्षांची मेहनत घालवली होती 'पाण्यात'
मिस युनिव्हर्स स्पर्धेत लारा दत्तानं 9.99 गुण मिळवत हा मुकूट जिंकला. आतापर्यंत अशी कामगिरी कोणालाच करता आलेली नाही.
|
1/ 6
2000मध्ये मिस युनिव्हर्सचा मुकूट जिंकणारी लारा दत्ताचा आज वाढदिवस. भारताकडून मिस युनिव्हर्सचा टायटल जिंकणारी लारा दत्ता दुसरी महिला होती. तिच्या आधी 1994मध्ये सुष्मिता सेननं अशी कामगिरी केली होती.
2/ 6
मिस युनिव्हर्स स्पर्धेत लारा दत्तानं 9.99 गुण मिळवत हा मुकूट जिंकला. आतापर्यंत अशी कामगिरी कोणालाच करता आलेली नाही. याशिवाय तिनं स्विमसूट फेरीतही सर्वांधिक गुण मिळवले होते.
3/ 6
आपल्या सौंदर्यानं संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या लारानं एकदा मात्र असं काही केलं की, तिचा पती आणि भारताचा टेनिस चॅम्पियन महेश भूपतीच्या भावना दुखावल्या होत्या. तिनं फक्त चॅम्पियनच्या अभिमानालाच ठेच पोहचवली नव्हती तर त्याच्या अनेक वर्षांच्या मेहनतीवर पाणी टाकलं होतं.
4/ 6
2017ला मुंबईमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसानं लोकांच्या घरात पाणी घुसत होतं. लारा आणि महेश भूपतीचं घरही याला अपवाद नव्हतं. मग लारानं घरात येणारं पाणी थांबवण्यासाठी महेश भूपतीचे सर्व टॉवेल फरशीवर टाकले. हे टॉवेल त्यानं टेऩिस स्पर्धा जिंकल्यावर त्यांची आठवण म्हणून जपून ठेवले होते.
5/ 6
लारा एवढेच करून थांबली नाही तर तिनं तिचा हा कारनाम्यचा फोटो ट्विटरवर शेअर करत पती महेशलाही टॅग केलं. या ट्वीटला कॅप्शन देताना लारानं लिहीलं, विंबल्डन, यूएस ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपनच्या सर्व टॉवेल्सचा मी चांगला वापर केला.
6/ 6
लाराच्या या कृतीनं मात्र महेश भूपती खूप चिडला. त्यावेळी महेश घरी नव्हता. पण त्यानं ट्विटरवर लाराला प्रतिक्रिया देत आपला राग व्यक्त केला. त्यानं लिहिलं, तू मस्करी करत आहेस का ? ही माझी अनेक वर्षांची मेहनत आहे.