मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘या बाईला कोणीतरी आवरा’; अजब योगा व्हिडीओंमुळं राखी सावंत ट्रोल

‘या बाईला कोणीतरी आवरा’; अजब योगा व्हिडीओंमुळं राखी सावंत ट्रोल

बारीक होण्यासाठी राखी सावंतची कठोर मेहनत, पाहा कोणत्या अभिनेत्रीसारखं व्हायचंय राखीला

बारीक होण्यासाठी राखी सावंतची कठोर मेहनत, पाहा कोणत्या अभिनेत्रीसारखं व्हायचंय राखीला

बारीक होण्यासाठी राखी सावंतची कठोर मेहनत, पाहा कोणत्या अभिनेत्रीसारखं व्हायचंय राखीला

मुंबई 14 जून: ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) आपल्या वादग्रस्त आणि चित्रविचित्र वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. अनेकदा यामुळं तिला ट्रोल देखील केलं जातं. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. राखी सध्या व्यायाम आणि योगा करतानाचे काही व्हिडीओ सातत्यानं सोशल मीडियावर शेअर करत आहे. (Yoga and exercise video) पण या व्हिडीओमध्ये तिनं केलेल्या कृती पाहून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. (Rakhi Sawant troll) ही बाई खरंच चक्रम आहे असं म्हणत सध्या तिची खिल्ली उडवली जात आहे.

लॉकडाउनमुळं सध्या जीम बंद आहेत. त्यामुळं राखी सावंत घरातच व्यायाम आणि योगा करत आहे. राखी काही प्रोफेशनल ट्रेनर्सच्या मदतीनं व्यायाम करत आहे. वर्कआउट करतानाचे काही व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर देखील शेअर केले. हे व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे. मानव प्रजातीला जिवंत ठेवायचं असेल तर असे व्हिडीओ शेअर करणं थांववा, ही बाई खरंच चक्रम आहे अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत काही नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

उतावळ्या पोपटलालचं होणार लग्न? ग्लॅमरस तरुणीनं हातात गुलाब घेऊन केलं प्रपोज

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

ड्रग्ज प्रकरणी झाली होती अटक; बाहेर पडताच अभिनेत्रीनं केलं BOLD फोटोशूट

राखीचं खरं नाव नीरु भेदा असं आहे. रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी तिने आपलं नाव बदललं. तिचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. आर्थिक टंचाईमुळे तिला पुरेसं शिक्षण घेता आलं नाही. लहान वयातच घराची आर्थिक जबाबदारी तिला सांभाळावी लागली. वयाच्या १३ वर्षी पेन कंपनीत काम करुन ती घराचा खर्च भागवायची. लहानपणापासूनच राखीला नृत्याची खूप आवड होती. गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्र अशा सणांच्या निमित्तानं आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये राखी भाग घेत असे. अन् तिथूनच तिच्या करिअरची सुरुवात झाली. 1997 साली 'अग्निचक्र' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये तिने आयटम सॉन्गवर डान्स केला.

‘डायनॅमिक राजाला मानाचा मुजरा’; केदार शिंदेकडून राज ठाकरेंना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

किंबहूना तिच्या अनोख्या नृत्यशैलीमुळे बॉलिवूडची नवी आयटम गर्ल म्हणून तिला ओळखलं जाऊ लागलं. काम मिळत असलं तरी पुरेसे पैसे मिळत नव्हते त्यामुळे अनेक श्रीमंत लोकांच्या लग्नात ती वेटरचं काम देखील करायची. टीना अंबानी यांच्या लग्नात तिला 50 रुपये टीप मिळाली होती हा अनुभव अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितला होता. कधीकाळी एक वेळच्या जेवणासाठी संघर्ष करणाऱ्या राखीनं आपली जिद्द आणि अफाट मेहनतीच्या जोरावर आज बॉलिवूडमध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Rakhi sawant, Troll, Video viral