अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
2/ 10
लक्षवेधी बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली होती.
3/ 10
या यादीत आता टीव्ही अभिनेत्री अबिगल पांडे आणि तिचा बॉयफ्रेंड सनम जोहर यांचं देखील नाव जोडलं गेलं होतं.
4/ 10
अबिगल आणि सनम यांची सुशांतसोबत खुप चांगली मैत्री होती. हे दोघंही अंमली पदार्थांच सेवन करतात असा संशय एनसीबीला आला होता.
5/ 10
त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात आली होती. शिवाय सुशांतच्या मृत्यू प्रकरणाशी त्यांचा हा काही संबंध आहे का हे देखील तपासण्यात आलं होतं.
6/ 10
परंतु अखेर अबिगलविरोधात कुठलेही ठोस असे पुरावे सापडले नाहीत त्यामुळं तिला आणि तिच्या बॉयफ्रेंडला सोडून देण्यात आलं.
7/ 10
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) ही नावं समोर आली होती.
8/ 10
एनसीबीला एक व्हॉट्सअॅप चॅट मिळालं होतं. यामध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याचं समोर आली होती.
9/ 10
एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान मोठे गौप्यस्फोट करण्यात आले. यामध्ये श्रद्धा कपूरसोबतच अन्य तीन अभिनेत्रींची ड्रग चॅटही समोर आली होती.
10/ 10
सध्या या सर्व ड्रग्ज प्रकरणाचा सुशांतच्या मृत्यूशी काही संबंध आहे का? या बाबत चौकशी सुरु आहे. या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या संशयीत आरोपी आहे.