मुंबई 14 जून: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. (Raj Thackeray Birthday) त्यांचं नुसतं भाषण ऐकण्यासाठी देखील लाखोंची गर्दी उसळते. अशा या करिश्माई नेत्याचा आज वाढदिवस आहे. 53 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील लोकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यानं देखील एक खास पत्र लिहून राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पाहुया काय म्हणाला केदार शिंदे?
“राजसाहेब..... ते राजकीय नेते म्हणून कसे आहेत? याविषयी लिहायला त्यातला मी माहीर नाही. पण एक कलावंत आणि मित्र म्हणून एका वाक्यात लिहू शकतो... तो राजा माणूस आहे.. तासनतास त्यांच्याशी कलाकार म्हणून संवाद साधू शकतो, त्यांच्याकडे जी माहिती आहे ती आत्मसात करणं फार अवघड आहे... संगीत चित्रपट या दोन क्षेत्रातला त्यांच्या तोडीचा माहितगार दुसरा कोणी मी पाहिला नाही.. मैत्री करावी तर या राजा माणसाशी.. सतत लक्ष असतं त्यांचं.. सतत संपर्कात असतात.. वाढदिवस साजरा करून वय वाढत, पण राजसाहेब यंग ॲन्ड डायनॅमिक आहेत... या कोरोनाच्या कठिण परीस्थिती मधे हा एकमेव राजकीय नेता होता, ज्याने कितीही विरोधात असला तरी त्याची राजकीय पोळी भाजली नाही.. हे आपल्याला सतत जाणवलय..मान्य करायालाच हवं...
शाळेत असताना सुशांत दिसायचा असा; पाहा अभिनेत्याचे Unseen Photos
बेरोजगार प्रीतम कसा झाला सुपरस्टार? पाहा सलमान खाननं केली होती अशी मदत
एकच वाटतं की, त्यांना त्यांच्या राजकीय क्षेत्रात अजून तशी संधी मिळाली नाही.. त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र हा फार वेगळा आहे. एकदम 70mm.. आपण इतक्या लोकांना संधी दिली.. काहींना न देता गोळाबेरीज करून त्यांनी आपली आपणच मिळवली... एकदा या राजा माणसाच्या हाती महाराष्ट्र राज्य देऊ.. नक्कीच आपल्यावर "राज्य" येणार नाही, याची ते काळजी घेतील..आज त्यांचा वाढदिवस आहे.. त्यानिमित्ताने हे गीफ्ट येत्या निवडणुकीत मनसे मतदान करून देऊ.. मला खात्री आहे, बाळासाहेब ठाकरे यांना मनोमन मानणारे राजसाहेब आपल्या अपेक्षा नक्कीच पुर्ण करतील…”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Birthday celebration, MNS, Raj raj thackeray