तारक मेहता का उल्टा चष्मा हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. जबरदस्त पटकथा आणि अभिनय यामुळं गेली 13 वर्ष सातत्यानं ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
2/ 10
तारक मेहतामधील सर्वच व्यक्तिरेखा लोकप्रिय आहेत. परंतु यामध्ये पत्रकार पोपटलाल हा मात्र खऱ्या अर्थानं सर्वांचं लक्ष वेधून घेतो.
3/ 10
या मालिकेत गेली अनेक वर्ष तो लग्न करण्याचा प्रयत्न करत आहे. अगदी उतावळा नवरा गुढग्याला बाशिंग अशी त्याची अवस्था आहे.
4/ 10
आजवर अनेकदा त्याचं लग्न होता होता मोडलं आहे. त्यामुळं प्रेक्षक देखील पोपटलालचं लग्न कधी होणार हा प्रश्न वारंवार निर्मात्यांना विचारत आहेत.
5/ 10
पण कदाचित याचं उत्तर लवकरच मिळेल अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. कारण मालिकेत एका तरुणीनं थेट पोपटलालला लग्नासाठी प्रपोज केलं आहे.
6/ 10
पोपटलाल सध्या औषधांची काळाबाजारी रोखण्यासाठी एका रिसॉर्टमध्ये आलाय. सध्या तो या अनधिकृत व्यवसायाविषयी पुरावे गोळा करत आहे.
7/ 10
दरम्यान याच रिसॉर्टमधील एका तरुणीनं पोपटलालला लग्नासाठी मागणी घातली आहे. तिचे प्रपोज करतानाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
8/ 10
यामुळं आता तरी पोपटलालचं लग्न होणार की पुन्हा एकदा तो लग्नाशिवायच राहणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
9/ 10
काही प्रेक्षकांच्या मते हे केवळ नाटक आहे. पोपटलालला लग्नाचं आमिष दाखवून फसवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची शक्यता आहे.
10/ 10
तर काही प्रेक्षकांच्या मते पोपटलालच त्या तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून फसवणार, आता नेमकं काय घडणार हे येत्या भागांमध्ये प्रेक्षकांना कळेल.