मुंबई, 08 ऑक्टोबर : ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी राखी दररोज (Rakhi Sawant Shocking Transformation) काहींना काही नवीन करत असते. राखीने एक नवीन लुक (Rakhi Sawant New Look) केला आहे ज्यामुळे तिचे चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत. राखीने सोशल मीडियावर तिचा असा एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला आहे की,राखीची नेमकी (Rakhi Sawant Old Age Photo)अशी अवस्था कशामुळे झाली आहे.
राखीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राखीचे केस पांढरे दिसत आहेत व डोळ्याला काळा चष्मा तसेच चेहऱ्यावर सुरकुत्या आणि गळ्याला पट्टा दिसत आहे. राखी या फोटोत म्हातारी दिसत आहे. सध्या राखीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रंचंड व्हायरल होत आहेत.
राखीने हे फोटो शेअर करत म्हटले आहे की, ही कोण आहे ओळखले का ?.. राखीच्या या फोटोवर जसलीन मथारूने देखील कमेंट केली आहे. तू जरी म्हातारी झालीस तरी सेक्सीच दिसणार, अशी कमेंट जसलीन मथारूने केली आहे. राखीचे हे बदलेले रूप पाहून मात्र तिचे चाहते मात्र चिंतेत आहेत.
View this post on Instagram
राखीने दुसऱ्या पोस्टमध्ये मेकअपचा वापर करून लुक कसा बदलला हे दाखवले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये राखीने म्हटले आहे की, रोहित भाई मला सोनी सब वाहिनीवरील बेगम बादशाह या मालिकेत एका 80 वर्षाच्या महिलेची भूमिका साकरण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभारी आहे. राखीच्या या लुकवर अनेक सेलेब्सनी कमेंट केल्या आहेत व तिच्या लुकचे कौतुक केले आहे.
Tattoo दाखवण्यासाठी श्रुती हसन झाली Topless; जाणून घ्या काय आहे या शब्दाचा अर्थ
राखीने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये ती 80 वर्षाच्या वृद्ध महिलेच्या गेटअपमध्ये डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ खूपच मजेदार आहे. राखीचा हा बदलेला अवतार 9 ऑक्टोबरला 7.30 ते 11 सोनी सब वाहिनीवर देखील पाहता येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Rakhi sawant, Rakhi Sawant (TV Actor)