‘कौन बनेगा करोडपती ' च्या 6 ऑक्टोबरच्या भागात हॉट सीटवर एक अशी स्पर्धक होती जिचे वडील 30 वर्षापूर्वी अमिताभ बच्चन यांचे पर्सनल बॉडीगार्ड होते. अमिताभ बच्चन यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ते दंग झाले त्यांना काय बोलवे अशी त्यांची स्थिती झाली. या स्पर्धकाचे नाव रश्मी कदम (Rashmi Kadam) आहे. रश्मी कदम पुण्याची आहे.रश्मी कदम राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल खेळाडू राहिली आहे आणि सध्या ती पुण्यात मानसशास्त्राची सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे. रश्मी कदम खूप छान खेळत होती आणि अमिताभ बच्चन सुद्धा तिचा अभ्यास पाहून आश्चर्यचकित झाले होते. शोच्या अधून मधून अमिताभ बच्चन रश्मीशी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बोलत होते. वाचा :Man Jhala Bajind : सरू आजीनंतर फुई आजीची चर्चा; रणवीर सिंगसोबत देखील केलं आहे काम वडील होते बॉडीगार्ड खेळ सुरू असताना अमिताभ बच्चन यांनी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या रश्मी कदम यांच्या वडिलांकडे बोट दाखवून त्यांचे नाव विचारले. त्यांनी सांगितले की, माझे नाव राजेंद्र कदम आहे आणि मी पुण्याचा रहिवासी आहे. त्यांना पाहताच अमिताभ यांनी विचारले की, तुम्ही पोलिसमध्ये आहात का, तेव्हा रश्मीच्या वडिलांचे उत्तर ऐकून अमिताभ बच्चन काही काळ स्तब्ध झाले. वाचा : स्पेन व्हेकेशनदरम्यान प्रियांका चोप्राचा सुपरहॉट LOOK; तुम्ही पाहिलात का हे फोटो? वडिलांनी सांगितली संपूर्ण गोष्ट रश्मीचे वडील म्हणाले की, 'सर, मी 1992 मध्ये तुमचा पीएसओ (वैयक्तिक सुरक्षा अधिकारी) होतो. मी तुमचा अंगरक्षक म्हणजे बॉडीगार्ड होतो. माझी इच्छा होती की, तुमच्यासोबत एक तरी फोटो काढावा. मात्र त्यावेळी मोबाईल फोनमध्ये कॅमेरे नव्हते. पण आज माझ्या मुलीमुळे माझी ही इच्छा पूर्ण झाली यासाठी मी खूप आनंदी आहे. हे ऐकून अमिताभ बच्चन थक्क झाले. ते म्हणाले की, जग किती लहान आहे. आणि हो, तुमच्यासोबत फोटो काढण्यास मला आनंद होईल. यानंतर रश्मी कदमने पुढचा प्रश्न खेळला आणि तिने 12 लाख 50 हजार रुपये जिंकले.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amitabh Bachchan, Entertainment, Pune, TV serials, Tv shows