Home /News /entertainment /

Tattoo दाखवण्यासाठी श्रुती हसन झाली Topless; जाणून घ्या काय आहे या शब्दाचा अर्थ

Tattoo दाखवण्यासाठी श्रुती हसन झाली Topless; जाणून घ्या काय आहे या शब्दाचा अर्थ

आगामी काळात श्रुती अभिनेता प्रभाससह (prabhas) सालार (salaar) चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 14 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे

    मुंबई, 7ऑक्टोबर-  सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडळी कायमच चाहत्यांशी एक वेगळं नातं जपताना दिसतात. या कलाकारांच्या यादीमध्ये बऱ्याच नावांचा समावेश आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतले दिग्गज कलाकार कमल हसन (kamal haasan) यांची मुलगी श्रुती हसनसुद्धा (Shruti Haasan) यामध्ये मागे नाही.
    सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या श्रुतीने आपल्या डाव्या खांद्यावर टॅटू काढला असून, तो दाखवण्यासाठी तिने एक टॉपलेस फोटो पोस्ट (Shruti Haasan photo) केला आहे. तिचा हा फोटो सर्वांसाठीच अनपेक्षित असला, तरी हा टॅटू ज्या पद्धतीने काढण्यात आला आहे, ते पाहून अनेकांनी तिची प्रशंसाही केली आहे. 'झी न्यूज'ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (हे वाचा:ही' व्यक्ती आहे समंथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटचं कारण? जाणून घ्या सत्य ) अभिनेत्री श्रुती हसन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती कायम तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत राहते. तिने नुकताच डाव्या खांद्यावर एक टॅटू काढला आहे. हा टॅटू आपल्या चाहत्यांना दाखवण्यासाठी तिने एक टॉपलेस फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.दिग्गज अभिनेते कमल हसन यांची मुलगी असणाऱ्या श्रुतीने आपल्या अभिनयाच्या बळावर चित्रपटसृष्टीमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. वेगवेगळ्या चित्रपटामध्ये भूमिका करताना दर्जेदार अभिनयाच्या बळावर तिने चाहत्यांना भुरळ घातली आहे. (हे वाचा:विकी कौशल बनणार साराचा पती! रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसणार ही जोडी) आगामी काळात श्रुती अभिनेता प्रभाससह (prabhas) सालार (salaar) चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 14 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय श्रुतीचा दी पॉवर (the power) हा हिंदी चित्रपटही ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. श्रुती या चित्रपटात विद्युत जामवालसह (Vidyut Jammwal) दिसली होती. दाक्षिणात्य (south movies) चित्रपटांव्यतिरिक्त या अभिनेत्रीने हिंदी चित्रपटसृष्टीतही (bollywood) आपली छाप उमटवली आहे.अभिनयासोबतच श्रुती तिच्या बोल्ड स्वभावासाठीही ओळखली जाते. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्तम गायिकाही आहे. तिनं नुकत्याच शेअर केलल्या फोटोमध्ये कृष्णधवल छटांमध्येही श्रुतीचं सौंदर्य अधिकच खुलून आल्याचं पाहायला मिळत आहे.फोटोमध्ये श्रुतीनं गोंदवलेला टॅटू दिसत असून हा टॅटू म्हणजे तमिळ भाषेत लिहिलेलं तिचं नाव आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं म्हटलंय, 'माझं नाव म्हणा... जोरात म्हणा...' श्रुतीच्या या फोटोला अनेक लाइक्स मिळाले असून, यावर कमेंट करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
    First published:

    Tags: Entertainment, South actress

    पुढील बातम्या