मुंबई, 06 मार्च : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतनं (Rakhi Sawant) बिग बॉसच्या (Bigg boss) घरात येऊन पुन्हा हे सिद्ध करून दाखवलं की तिला ‘एन्टरटेन्मेंट क्वीन’ का म्हणतात. राखी सावंतनं बिग बॉसच्या घरामध्ये राहून प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. बिग बॉसच्या 14 व्या सीझनमध्ये (Bigg Boss 14) राखीनं सर्वांचं चांगलं मनोरंजन केलं असल्याचं बिग बॉसनंदेखील फिनालेच्या आधी कबूल केलं. आता बिग बॉस संपलं आहे पण बिग बॉसचा हँगओव्हर राखी सावंतच्या डोक्यातून अजूनही उतरला नाही. राखी सावंत या दिवसामध्ये आपल्या आईच्या आजारपणामुळे दु:खी आहे. दु:खात असतानासुद्धा राखी सावंत सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या राखी सावंतनं इन्स्टाग्रामवर एक फनी व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीसुद्धा पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओमध्ये राखी सावंत आपल्या घरामध्ये भांडी घासण्यापासून झाडू मारण्यापर्यंत, बेड आवरण्यापासून ते कपडे धुण्यापर्यंतची सर्व काम करताना दिसत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत राखी सावंतनं कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, ‘बिग बॉसच्या घरातून पूर्णपणे गृहिणी होऊन बाहेर पडली. हॅपी वुमन्स डे.’
राखी सावंतनं पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला ती भांडी घासताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणते की, ‘बिग बॉस मी जोपर्यंत भांडी घासत नाही तोपर्यंत मला रात्रीची झोप येत नाही.’ या व्हिडिओत ती आपली नखं दाखवत म्हणते की, ‘नखं नवीन लावून आले आहे, माझ्या हाताची अवस्था बघा.’ हे वाचा - सलमान खाननंतरच मी लग्न करणार; या प्रसिद्ध गायकाने व्यक्त केली इच्छा राखी सावंत तिच्या नेहमीच्या फनी अंदाजमध्ये सतत बिग बॉसला आठवण करून देते की, ‘बिग बॉस आणि सलमान खाननं मला गृहिणी बनवलं. मला सर्व कामं करायला शिकवलं. बिग बॉस संपल्यानंतर मी वेडी झाली आहे आणि फक्त घरामधील कामं करत आहे.’ तर लादी पुसताना राखी म्हणते की, ‘ये मैं हू, ये मेरा घर है और ये मेरा पोछा है….और यहां पावरी नही हो रहा है, यहां सिर्फ पोछा लग रहा है, घर साफ हो रहा है.’ हे वाचा - VIDEO : ‘मी सुशांतला अनेकदा मरताना पाहिलं आहे,’ अभिषेक कपूरने लिहिली भावनिक पोस्ट राखी सावंतनं या व्हिडिओमध्ये दमदार रिअॅक्शन दिले आहेत. तिच्या या व्हिडिओला 79 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. राखी सावंतच्या या व्हिडिओवर भरभरून कमेंट्स करत सगळे जण तिचं कौतुक करत आहेत. काही दिवसांपूर्वी राखी सावंतनं एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये ती आनंदी होत एका चाहत्याकडून तिला मिळालेले गिफ्ट दाखवत होती.