मुंबई, 05 मार्च : गेल्या वर्षी 14 जून रोजी बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput Death) आत्महत्या केली होती. सुशांतच्या अचानक अशा जाण्याने समस्त बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली होती. यानंतर अनेक बॉलीवूडकरांनी दुःख व्यक्त करत सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला होता. सुशांतच्या मृत्यूला आता जवळपास 9 महिने उलटले आहेत. तरीही अनेक चाहते सुशांतच्या आठवणीत व्याकूळ झाले आहेत. अशातच चित्रपट दिग्दर्शक अभिषेक कपूरने (Director Abhishek Kapoor) सुशांतच्या 'काय पो छे' (Kai Po Chhe) या चित्रपटाच्या मेकिंगचा एक व्हिडिओ शेअर करत सुशांतची आठवण (Remembered Sushant) काढली आहे. अभिषेक कपूर यांनी एक भावनिक पोस्ट (Wrote Emotinal Note) देखील लिहिली आहे.
अभिषेक कपूर यांनी 'काय पो छे' चित्रपटाच्या शुटींगचा एक व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे. त्यामध्ये या चित्रपटाच्या क्लायमॅक्सचं शुटींग सुरू असल्याचं दिसत आहे. यामध्ये दिग्दर्शक अभिषेक कपूर सुशांतला बॉडी लॅंग्वेज कशी आसावी, याबद्दल समाजावून सांगत आहेत. हे दृश्यात सुशांत आणि राजकुमार राव यांच्या मारामारी होत असताना दिसत आहे. या क्लायमॅक्स दृश्यासाठी सुशांत खूप मेहनत करताना दिसत आहे.
हे ही वाचा-सुशांत प्रकरणात नवा ट्विस्ट; NCBनं रियाविरोधात दाखल केलं 30 हजार पानी आरोपपत्र
सुशांतच्या आठवणीने अभिषेक कपूर भावूक
अभिषेक कपूर यांनी हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलं की, 'ज्यावेळी आम्ही या चित्रपटाची कथा लिहित होतो, त्यावेळी आम्ही खूपचं उत्साही होतो. मला आठवतंय, ज्यावेळी या चित्रपटाचा क्लायमॅक्स लिहिला गेला, तेव्हा मी खूप रडलो होतो. या चित्रपटाची शुटींग पूर्ण झाल्यानंतरही मी रडलो होतो. या चित्रपटाचं एडिटींग पूर्ण झाल्यानंतरही मला रडायला आलं. हा चित्रपट जेव्हा मी बॅकग्राउंड स्कोर टाकल्यानंतरही मला माझं रडणं थांबलं नाही.'
View this post on Instagram
हे ही वाचा- सुशांत प्रकरणात नवा ट्विस्ट; NCBनं रियाविरोधात दाखल केलं 30 हजार पानी आरोपपत्र
त्यांनी पुढं लिहिलं की, 'मी इशानला (सुशांत सिंग राजपूत) बर्याच वेळा मरताना पाहिलं आहे. केदारनाथमध्येही त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच कदाचित 14 जून रोजी मला जेव्हा ही वाईट बातमी कळाली तेव्हा मला धक्का बसला. अजूनही त्या धक्क्यातून सावरता येत नाही. 'काय पो छे' चित्रपटाला 8 वर्षे पूर्ण' त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. सुशांतच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया देत, सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.