मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सलमान खाननंतरच मी लग्न करणार; या प्रसिद्ध गायकाने व्यक्त केली इच्छा

सलमान खाननंतरच मी लग्न करणार; या प्रसिद्ध गायकाने व्यक्त केली इच्छा

Mika Singh Marriage: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंगचं (Mika Singh) लग्नाचं वय उलटत असूनही त्याने अद्याप लग्न केलं नाही. एका कार्यक्रमात त्याने 'शेवटपर्यंत बिगर लग्नाचं' राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

    मुंबई, 05 मार्च: बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंगचं (Mika Singh) लग्नाचं वय उलटत असूनही त्याने अद्याप लग्न केलं नाही. 'शेवटपर्यंत बिगर लग्नाचं' राहण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे. नुकताचं एका कार्यक्रमा दरम्यान मिकाने हा खुलासा केला आहे. आपण होणाऱ्या पत्नीचा शोध घेत असल्याचंही त्याने यावेळी म्हटलं आहे. असं असलं तर अभिनेता सलमान खाननंतरच (Salman Khan Marriage) आपण लग्न करणार आहे, असंही मिका सिंगने सांगितलं आहे. मिकाने हा खुलासा इंडियन प्रो म्युझिक लीगच्या (Indian Pro Music League) कार्यक्रमात केला आहे. या शोमध्ये भाग घेणारा तो पंजाब लायन्स टीमचा कप्तान आहे. मिका व्यतिरिक्त कैलाश खेर, साजिद खान, शान, अंकित तिवारी, जावेद अली, असीस कौर, भूमि त्रिवेदी, अक्षिती कक्कर, पायल देव, नेहा भसीन आणि शिल्पा राव हे सर्व देखील या कार्यक्रमातील कप्तान आहेत. टेलीचक्करने दिलेल्या वृत्तानुसार, गायक मिका सिंग म्हणाला की "सध्या मी लग्नासाठी मुलगी शोधत आहे." मला स्वत: ला इंडियन प्रो म्युझिक लीगच्या माध्यमातून कोणीतरी सापडेल. पण सलमान खानच्या लग्नानंतरच मी लग्न करणार आहे. तोपर्यंत मी माझ्या बॅचलर आयुष्याचा आनंद घेणार आहे. जसं साजिद खान यापूर्वीच म्हटला आहे की, बॉलिवूडमध्ये सलमान भाईनंतर मीच एकमेव 'फॉरएव्हर बॅचलर' आहे. त्यामुळे जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत हा टॅग ठेवायला मला आवडेल.' हे ही वाचा -जान्हवी कपूरचं ठरलंय! पहिल्यांदाच चाहत्यांसोबत शेअर केला Wedding Plan काही वर्षांपूर्वी मिका सिंगने गंमतीत म्हटलं होतं की, माझ्या सिंगलपणाला माझा मोठा भाऊ गायक दलेर मेहंदी जबाबदार आहे. असं असलं तरी या वर्षाच्या सुरुवातीला हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत दलेरने हे आरोप नाकारले आहेत. यावेळी दलेरनं म्हटलं की, त्याचं लग्न होतं नाहीये. यासाठी त्याचे वैयक्तिक अपयश कारणीभूत असू शकतात. दलेरने पुढे सांगितलं की, मिका खरोखरच सेटल व्हावा अशी माझी इच्छा आहे. हे ही वाचा -VIDEO : 'मी सुशांतला अनेकदा मरताना पाहिलं आहे,'अभिषेक कपूरने लिहिली भावनिक पोस्ट 'मागच्या वेळी जेव्हा मी त्याला भेटलो, तेव्हा त्याला म्हटलो होतो की, "लग्न कर." मला असं वाटतं की, त्याला खूप सारी मुलं असावीत. त्याच्याकडे एवढा सारा पैसा आहे, संपत्ती आहे. हे सर्व कशासाठी आहे ? यावर्षी माझा प्रयत्न असेल की त्याने लग्न करावं. त्यासाठी त्याला मारहाण करावी लागली तरी चालेल, पण यावर्षी मी त्याला बोहल्यावर चढवणार आहे, असंही दलेर मेहंदीने म्हटलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bollywood News, Salman khan, Singer

    पुढील बातम्या