मुंबई, 10 मार्च: राखी सावंत (Rakhi Sawant) काही ना कोणत्या कारणाने दररोज चर्चेत असते. बिग बॉस 14 (Bigg Boss 14) मध्ये आपला वेगळा अवतार प्रेक्षकांना दाखवल्यानंतर ती आता पुन्हा एकदा आपल्या नवीन अवतारामुळे चर्चेत आली आहे. राखीचा हा नवीन अवतार तिने कसा केला हे पाहून तिचे चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. बिग बॉस 14 दरम्यान राखीने तिचा ‘ज्युली’ अवतारही दाखवला होता आणि अभिनव शुक्लावर प्रेमाचा दावा करून एक वेडी प्रेमी सुद्धा ती बनली होती. आता राखी सावंतने घेतलेला नवीन अवतार म्हणजे श्रीदेवीचा (Sridevi) ‘नागीन’ (Naagin) अवतार.
राखी सावंतचा हा नवा लूक पाहिल्यानंतर कोणीही त्यांच्या हसण्यावर कंट्रोल करू शकणार नाही. या व्हिडिओमध्ये राखी ‘मैं नागिन तू सपेरा’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. परंतु हा एक मॉर्फ्ड व्हिडीओ आहे ज्यामध्ये श्रीदेवीच्या चेहरावर राखीने तिचा चेहरा लावला आहे. हा व्हिडीओ ड्रामा क्वीन राखी सावंतच्या चाहत्यांना खूपच पसंतीला उतरत आहे. यात ती खूप मजेशीर दिसत असून लोकांच्या खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत. हे वाचा - आलिया भट्टचा कोरोना अहवाल आला Negative, रणबीरसाठी लिहिला खास मेसेज काही चाहत्यांनी तिला तिने हे कसं केलं हा प्रश्न देखील केला आहे. राखी सावंतने सांगितलं आहे की ती श्रीदेवी यांची खूप मोठी चाहती आहे आणि त्याचं कारणाने तिने हा व्हिडीओ बनवला आहे. व्हिडीओ शेअर करताना राखीने चाहत्यांना यावर त्यांच्या प्रतिक्रिया देण्याचं आवाहन देखील केलं आहे. परंतु यावेळी तिच्याकडून एक छोटीशी चूक सुद्धा झाली आहे. कॅप्शनमध्ये राखीने चित्रपटाचे नाव लिहिले आहे. तिने ‘नागिन’ ऐवजी ‘नगीना’ असं लिहिलं आहे.