मुंबई, 24 नोव्हेंबर : सध्या महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण सर्व बाजूंनी तापलेलं आहे. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत सर्वांनाच धक्का दिला होता. दरम्यान राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी एक मोठा गट फोडून भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सध्या महाराष्ट्रात परस्पर विरोधी विचारसारणी असलेले पक्ष एकत्र येत सत्तास्थापनेचा दावा करताना दिसत आहेत. देशभरातून यावर प्रतिक्रिया येत असतानाच अभिनेत्री राखी सावंतनंही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या राखी सावंत हिने महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्ता स्थापनेच्या खेळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तिने इन्स्टाग्रमावर व्हिडीओ शेअर करुन प्रतिक्रिया दिली. बॉलिवूडमध्ये येण्याआधी ‘गे’ व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती ‘ही’ अभिनेत्री राखीनं तिच्या व्हिडीओमध्ये म्हटलं, ‘मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सांगितले होते एकमेकांविरोधात भांडू नका, आणि लवकरात लवकर सरकार स्थापन करा. परंतु त्यांनी माझे ऐकले नाही. आता बघा, अमित शाह यांनी शरद पवार यांना फोन करुन उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थापनेचे सर्व मार्गच बंद करुन टाकले. या सर्व प्रकरणामागे मास्टर माईंड अमित शाह यांचा हात आहे.’
महाराष्ट्रात झालेली राजकीय उलथापालथ सर्वांचीच झोप उडवणारी ठरली. सत्तासंघर्ष सोडवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीकडून सातत्याने बैठकांचा सिलसिला सुरू होता. आज चर्चा अंतिम टप्प्यात येणार असल्याची चर्चाही होती. अखेरच्या टप्प्यात सगळे ठरत असताना मात्र अचानक राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ झाली. राजभवनात थेट मुख्ममंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. राजभवनात शनिवारी सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. ‘…तर देशात हुकूमशाही लागू करा’, महाराष्ट्राच्या राजकारणावर शरद पोंक्षे संतापले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार राष्ट्रवादीतला एक मोठा गट फोडून अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भाजपला पूर्ण बहुमत नसल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या मदतीने त्यांनी हे सरकार स्थापन केलं आहे. अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या सगळ्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीकडून फक्त अजित पवार कुटुंब दिसलं आहे. राष्ट्रवादीचे इतर कोणतेही नेते किंवा स्वत: शरद पवार हे यावेळी कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे पवार कुटुंबीयामध्ये राजकीय आणि कौटुंबीक फूट पडल्याचं स्पष्ट झालं. …जेव्हा सलमानच्या शाळेत वडील सलीम खान यांना झाली होती शिक्षा! ===============================================================