मुंबई, 24 नोव्हेंबर : अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान आज 84 वा वाढदिवस साजरा करत आहेत. सलीम खान यांच्या फिल्मी कारकिर्दीबद्दल तर नेहमीच बोललं जातं पण आज आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील असा किस्सा सांगणार आहोत जो फार कमी लोकांना माहित आहे आणि विशेष म्हणजे हा किस्सा सलमान खानच्या शालेय आयुष्याशी संबंधित आहे. हा किस्सा सलमान खाननं एका सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान कपिल शर्मा शोमध्ये सांगितला होता. या शोमध्ये सलमान त्याच्या बालपणीच्या आठवणी सांगत होता त्यावेळी त्यानं त्याच्या शाळेत वडील सलीम खान यांना कशी शिक्षा झाली होती याचा खुलासा केला. सलमाननं सांगितलं, एक दिवस माझ्या शिक्षकांनी मला फ्लॅग पोस्टजवळ उभं राहण्याची शिक्षा केली होती. जेव्हा घरी जाण्याआधी बाबा शाळेत आले तेव्हा त्यांनी मला विचारलं काय झालं. त्यावर मी म्हटलं, मला माहित नाही पण मला बाहेर उभं राहायला सांगितलं गेलं आहे. हे ऐकल्यावर बाबा शाळेच्या मुख्याध्यापकांकडे गेले आणि त्यांना याविषयी विचारलं. त्यावर मुख्याध्यापकांनी शाळेची फी न भरल्यानं शिक्षा केल्याचं सांगितलं. त्यावर बाबा म्हणाले, शाळेची फी भरणं माझी जबाबदारी आहे. तुमची जबाबदारी आहे की तुम्ही त्याला वर्गात बसवण्याची, चूक माझी आहे तर मग तुम्ही त्याला शिक्षा का दिली आहे.
ग्लोबलस्टार प्रियांकाला आजही आहे ही ‘मिडल क्लास’ सवय, वाचून तुम्हीही व्हाल हैराण
सलमान पुढे म्हणाला, त्यानंतर लंच ब्रेकनंतर संध्याकाळी शाळा सुटेपर्यंत बाबा फ्लॅग पोस्टजवळ उभे राहिले. दुसऱ्या दिवशी त्यांनी माझी शाळेची फी भरली आणि शिक्षकांचीही माफी मागितली. अशाप्रकारे सलमानच्या वडीलांनी मुख्याध्यापकांशी बोलून फी न भरण्याची शिक्षा स्वतः भोगली. सलमाननं अनेकदा सांगितलं आहे की, त्याचे वडील त्याच्या आयुष्यातील कोणत्याही वळणावर सल्ला देतात. सलमानच्या कठिण काळातही त्यांनी अनेकदा त्याला मार्ग दाखवला होता आणि अनेकदा आपल्या करिअर बाबतचे सल्ले सुद्धा सलमान त्याच्या वडीलांकडूनच घेतो.
बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींनी केलं स्वतःहून कमी वयाच्या बॉयफ्रेंडशी लग्न
सलमान खान आणि त्याचे दोन्ही भाऊ अरबाज आणि सोहेल यांचं त्यांच्या वडीलांशी खूप चांगलं बॉन्डिंग आहे. हे तिन्ही भाऊ वडीलांसोबत मित्रांसारखे राहतात. मात्र त्यांच्याकडून काही चूक झाल्यवर मात्र वडीलांकडून त्यांना शिक्षा ही मिळतेच. सलीम खान यांच्या सिनेमांबद्दल बोलायचं तर त्यांनी बॉलिवूडमध्ये भरीव योगदान आहे. ते बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांनी शोले, जंजीर सारखे अनेक ब्लॉकबस्टर सिनेमा दिले आहेत.
Thalaivi First Poster Release: कंगनाचा लुक पाहून चाहत्यांना राग अनावर, म्हणाले..
======================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







