मुंबई, 24 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीनं 2003 मध्ये ‘जानशीन’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. या सिनेमात तिनं अभिनेता फरदीन थखानसोबत स्क्रिन शेअर केली. तिचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नव्हता मात्र यातील गाणी मात्र प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली. सेलिना बॉलिवूडमध्ये काही खास जागा बनवू शकली नाही. पुढे तिनं एका विदेशी बिझनेसमन सोबत लग्न करुन संसार थाटला. आज सेलिना 38 वा वाढदिवस. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सेलिनानं तिच्या आयुष्यातील एका अशा गोष्टीचा खुलासा केला ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. सेलिना लवकरच ‘अ ट्रिब्यूट टू रितुपर्णो घोष: सीजन्स ग्रीटिंग्स’ या सिनेमातून कमबॅक करत आहे. जवळपास 7 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये परतणाऱ्या सेलिनानं काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं. यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याविषयी एक धक्कादायक खुलासा केला. सेलिनानं टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, कोलकातामध्ये एका गे मेकअप आर्टिस्ट माझी माझ्या आईसारखी काळजी घेत असे. त्यावेळी मी मॉडेल म्हणून स्ट्रगल करत होते. त्यावेळी मी एका गे व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होते. तो वयानं बराच मोठा होता आणि मी अवघ्या 16 वर्षांची होते. त्यावेळी काही लोकांच्या अचानक मृत्यूनं माझं आयुष्य बदललं.
सेलिना पुढे म्हणाली, त्यावेळी मला एक गोष्ट समजली की सर्वांना हा हक्क आहे की त्यांना कोणासोबत राहायचं आहे. त्यावेळी मला समजलं की मला काहीतरी करायला हवं. मी अनेक वर्षं LGBT अॅक्टिव्हीस्ट होते. यूएनने या कामासाठी गुडविल अँबेसिडर म्हणूनही निवडलं होतं. सेलिना जेटलीनं 2001 मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकून त्यानंतर बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं.
सेलिनानं बॉलिवूडच्या काही सिनेमांमध्ये काम केलं मात्र तिला फारशी कमाल करता आली नाही. 2011 मध्ये तिनं बिझनेसमन पीटर हागशी लग्न केलं. त्यानंतर ती बॉलिवूडपासून दूर झाली. सेलिना चार मुलांची आई आहे. 2012 मध्ये तिनं जुळ्या मुलांना जन्म दिला. ज्यांची नावं विराज आणि विस्टन अशी आहेत. त्यानंतर 2017 मध्ये ती पुन्हा आई झाली त्यावेळीही तिनं जुळ्या मुलांना जन्म दिला. ============================================================