Home /News /entertainment /

राखी सावंतनं 8 महिन्यांनंतर शेअर केला लग्नाचा फोटो, नवराही दिसला सोबत

राखी सावंतनं 8 महिन्यांनंतर शेअर केला लग्नाचा फोटो, नवराही दिसला सोबत

नवरा मीडियापासून दूर राहणंच पसंत करतो असं कारण देत राखीनं नेहमीच त्याचा फोटो शेअर करणं टाळलं आहे.

  मुंबई, 17 एप्रिल : ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत काही ना काही कारणानं सतत चर्चेत राहते. मागच्या संपूर्ण वर्षात राखी तिच्या लग्नाच्या वृत्तामुळे प्रचंड चर्चेत राहिली. तिनं अद्याप तिच्या पतीचा एकही फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाही. त्यामुळे अनेकांना तिच्या लग्नाच्या वृत्तावर अजिबात विश्वास बसलेला नाही. पण आता मात्र 8 महिन्यांनंतर लग्नाचा फोटो शेअर करुन राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नवरा मीडियापासून दूर राहणंच पसंत करतो असं कारण देत राखीनं नेहमीच त्याचा फोटो शेअर करणं टाळलं आहे. पण आता तिनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात तिने नवरीच्या वेशात नवऱ्याचा हात पकडलेला दिसत आहे. मात्र याही फोटोमध्ये तिच्या नवऱ्याचा चेहरा दिसत नाही तिनं चालाखीनं त्याचा चेहरा लपवला आहे. फोटो शेअर करताना तिनं लिहिलं, 'माझ्या लग्नाचा फोटो' हा फोटो पाहिल्यावर युजर्सनी पुन्हा एकदा तिच्याकडे पतीचा फोटो दाखवण्याची मागणी केली आहे. कंगनाच्या बहिणीचं Twitter अकाउंट झालं बंद, वाचा नेमकं काय आहे कारण
  View this post on Instagram

  Meri shadi ki picture

  A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

  राखी सावंतनं मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आपलं लग्न झालं असल्याचा खुलासा केला होता. एका एनआरआय चाहत्यासोबत अत्यंत खासगी समारंभात आपण लग्न केल्याचं राखीचं म्हणणं होतं. माझा नवरा नेहमीच मीडियापासून दूर राहणं पसंत करतो असं तिनं यावेळी म्हटलं होतं त्यामुळे त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाही असं कारणही यावेळी राखीनं दिलं होतं. याबाबत स्पॉटबॉय-ईनं एक वृत्त दिलं होतं ज्यात त्यांनी 28 जुलै 2019 ला राखीनं लग्न केल्याची शक्यता वर्तवली होती. एजाज खानच्या VIDEO मुळे सोशल मीडियावर खळबळ, अभिनेत्याच्या अटकेची होतेय मागणी
  View this post on Instagram

  A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

  लग्नानंतर ती अनेकदा मंगळसूत्र आणि भांगात सिंदूर अशा वेशात दिसली होती. याशिवाय तिनं तिचा नवरा युरोपमध्ये राहत असल्याचा दावा केला होता. एवढंच नाही तर बॉलिवूड सोडून लवकरच युरोपला शिफ्ट होणार असल्याचंही तिनं म्हटलं होतं. मात्र सध्या लॉकडाऊन असल्यानं अस काही करणं शक्य नाही. त्यामुळे पुन्हा एकदा लग्नाच्या या फोटोमुळे राखी सावंत पुन्हा चर्चेत आली आहे. ड्रेस इस्त्री केला नाही म्हणून करिनानं स्टाफवर काढला राग, व्हायरल झाला VIDEO
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Rakhi sawant

  पुढील बातम्या