मुंबई, 16 एप्रिल : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतची बहीण रंगोली चंडेल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आतापर्यंत रंगोलीनं तिच्या ट्वीटरवरुन अनेक वेगवेगळ्या मुद्यांवर बोलताना दिसते. अनेकदा कंगनाची बाजू घेण्याच्या नादात तिनं आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकरांशी पंगा घेतला आहे. पण नुकत्याच एका वादग्रस्त ट्वीटनंतर रंगोली चंडेलचं ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे याबाबत हृतिक रोशनच्या एका नातेवाईकानं रंगोलीचं ट्विटर रिपोर्ट केलं होतं. रंगोली चंडेलला तिचं अकाउंट सस्पेंड करण्याआधी अशा प्रकारे वादग्रस्त ट्वीट न करण्याविषयी ताकीद देण्यात आली होती. मात्र एवढं होऊनही रंगोली ट्वीट करत राहिली त्यामुळे ट्विटरनं तिच्यावर कारवाई करत तिचं अकाउंट सस्पेंड केलं आहे. रंगोलीला वादग्रस्त ट्वीट न करण्याबाबत ताकीद दिल्याबद्दल तिनं स्वतःच ट्वीट करुन सांगितलं होतं. तिनं ट्विटर कडून मला ताकीद मिळाली आहे असं ट्वीट केलं होतं.
ड्रेस इस्त्री केला नाही म्हणून करिनानं स्टाफवर काढला राग, व्हायरल झाला VIDEO
काही दिवसांपूर्वी डॉक्टर आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्याबाबत रंगोलीनं एक ट्वीट केलं होतं. तिनं लिहिलं होतं, एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जेव्हा पोलीस आणि डॉक्टर त्याच्या कुटुंबाला तपासण्यासाठी गेले तर त्यांनी पोलीस आणि डॉक्टरांवर हल्ला केला. धर्मनिरपेक्ष मीडिया आणि मुल्ला यांना एका रांगेत उभं करुन गोळ्या घालायला हव्या. यामुळे आपल्याला भविष्यात नाझी म्हटलं जाईल पण त्याची पर्वा नाही. आयुष्यात फेक इमेज बनवण्यापेक्षा तर हे चांगलं आहे. रंगोली चंडेलच्या या ट्वीटनंतर हृतिक रोशनच्या एक्स वाईफची बहीण फराह खाननं तिचं अकाउंट रिपोर्ट केलं होतं. रंगोली चंडेलवर कारवाई झाल्यानंतर फराहनं ट्वीट करून ट्विटर आणि ट्विटर इंडियाचे आभार मानले आहेत. तिनं लिहिलं, मी याबाबत तक्रार केली कारण ती मागच्या काही काळापासून सतत एकाच समुदायाच्या लोकांना टार्गेट करत होती. एवढंच नाही तर तिनं मीडियालाही टार्गेट करत त्यांना गोळी मारण्याचं भाष्य केलं होतं आणि खुलेआम आपण नाझीवादी असल्याचं कबुल सुद्धा केलं होतं.
काही जोकरांमुळे कोरोना पसरतोय, डॉक्टर-पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर भडकला भाईजान
Thank you @Twitter @TwitterIndia @jack for suspending this account. I reported this because she targeted a specific community and called for them to be shot along with liberal media and compared herself to the Nazis. 🙏🙏🙏 . pic.twitter.com/lJ3u6btyOm
— Farah Khan (@FarahKhanAli) April 16, 2020
रंगोलीनं मुरादाबादमध्ये डॉक्टर आणि पोलीसांवर झालेल्या हल्ल्याबाबत वादग्रस्त ट्वीट केलं होतं. कोरोना व्हायरस संशयित लोकांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांची टीम त्याठीकाणी पोहोचली होती. त्यावेळी स्थानिक लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. (संपादन : मेघा जेठे.) रामायणातील लव-कुश सध्या काय करतात? एक तर आहे प्रसिद्ध अभिनेता