मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘पोसता येत नाही तर मुलांना जन्म का देता?’; भीक मागणाऱ्या मुलांमुळं राखी संतापली

‘पोसता येत नाही तर मुलांना जन्म का देता?’; भीक मागणाऱ्या मुलांमुळं राखी संतापली

‘पोसता येत नाही तर मुलांना जन्म का देता?’; रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांच्या आईवर राखी सावंत संतापली

‘पोसता येत नाही तर मुलांना जन्म का देता?’; रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांच्या आईवर राखी सावंत संतापली

‘पोसता येत नाही तर मुलांना जन्म का देता?’; रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांच्या आईवर राखी सावंत संतापली

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 14 एप्रिल: अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) आपल्या वादग्रस्त आणि चित्रविचित्र विधानांमुळं नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील राजकारण ते देशभरात घडणाऱ्या घडामोडी अशा विविध विषयांवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. यामुळं अनेकदा तिला ट्रोल देखील केलं जातं. (Video Viral) राखीचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. रस्त्यावर भीक मागणाऱ्या लहान मुलांना तिनं मदत केली. (Distributes Fruits to Needy Kids) शिवाय त्यांच्या पालकांवर संताप देखील व्यक्त केला.

राखीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये राखी काही गरीब मुलांना फळं खरेदी करुन देताना दिसत आहे. शिवाय तिनं या मुलांच्या भवितव्याची चिंता करत त्यांच्या आई-वडिलांवर संताप व्यक्त केला. “जर मुलांचा सांभाळ करण्याची क्षमता नाही. त्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत. तर तुम्ही मुलांना जन्म का देता? का भीक मागायला सांगता आणि त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करता?” असा संतप्त सवाल राखीनं त्या भीक मागणाऱ्या मुलांच्या पालकांना केला आहे. राखीची हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अनेकांनी या मदतीसाठी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील केला आहे.

अवश्य पाहा - मराठी अभिनेत्यामुळं झाली कोट्यधीश; flop Rupali कशी झाली लोकप्रिय?

अवश्य पाहा - MI vs KKR: मुंबईच्या विजयामुळं Shahrukh झाला नाराज; मागितली चाहत्यांची माफी

कोण आहे राखी सावंत?

राखीचं खरं नाव नीरु भेदा असं आहे. रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी तिने आपलं नाव बदललं. तिचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. आर्थिक टंचाईमुळे तिला पुरेसं शिक्षण घेता आलं नाही. लहान वयातच घराची आर्थिक जबाबदारी तिला सांभाळावी लागली. वयाच्या १३ वर्षी पेन कंपनीत काम करुन ती घराचा खर्च भागवायची. लहानपणापासूनच राखीला नृत्याची खूप आवड होती. गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्र अशा सणांच्या निमित्तानं आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये राखी भाग घेत असे. अन् तिथूनच तिच्या करिअरची सुरुवात झाली. 1997 साली 'अग्निचक्र' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये तिने आयटम सॉन्गवर डान्स केला. किंबहूना तिच्या अनोख्या नृत्यशैलीमुळे बॉलिवूडची नवी आयटम गर्ल म्हणून तिला ओळखलं जाऊ लागलं. काम मिळत असलं तरी पुरेसे पैसे मिळत नव्हते त्यामुळे अनेक श्रीमंत लोकांच्या लग्नात ती वेटरचं काम देखील करायची. टीना अंबानी यांच्या लग्नात तिला 50 रुपये टीप मिळाली होती हा अनुभव अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितला होता. कधीकाळी एक वेळच्या जेवणासाठी संघर्ष करणाऱ्या राखीनं आपली जिद्द आणि अफाट मेहनतीच्या जोरावर आज बॉलिवूडमध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे.

First published:

Tags: Live video, Rakhi sawant, Tv actress, Tv serial, Video viral