जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Rakhi Sawant: राखी सावंतवर लवकरच बनणार सिनेमा; ड्रामा क्वीनचं वादग्रस्त आयुष्य दिसणार मोठ्या पडद्यावर

Rakhi Sawant: राखी सावंतवर लवकरच बनणार सिनेमा; ड्रामा क्वीनचं वादग्रस्त आयुष्य दिसणार मोठ्या पडद्यावर

राखी सावंत

राखी सावंत

ड्रामा क्वीन राखी सावंतच्या आयुष्यावर भाष्य करणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 02 मार्च: राखी सावंत ला आज कोण ओळखत नाही. ‘ड्रामा क्वीन’ राखी सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. तिच्या संसाराचं सत्य चव्हाट्यावर आलं. तिच्यावर एकामागे एक संकटं कोसळली. आधी आईचं निधन झालं, मग अदिलने धोका दिला. या सगळ्यात राखीने अदिलला तुरुंगात पोहचवलं. तो सध्या तुरुंगातच असून राखी त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच आता ती दुबईत नव्या कामाला सुरुवात करणार अशी बातमी समोर आली होती. राखी दुबईत अभिनय क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी डान्स आणि ऍक्टिंगचं प्रशिक्षण देणारी अकादमी सुरु करणार आहे. त्यानंतर तिच्याविषयी अजून एक मोठी बातमी समोर येत आहे. राखीचे आयुष्य सोपे नव्हते हे सर्वांना माहीत आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. आजवर राखी अनेक वादात अडकली आहे. एवढंच नाही तर मध्यंतरी तिने तुरुंगाची वारी देखील केली आहे. तर आता आदिलमुळे ती चर्चेत आली.  राखी सावंतने पती आदिल खानवर मारहाण, शोषण आणि पैशांची अफरातफर केल्याचे गंभीर आरोप केले.  राखीच्या तक्रारीनंतर आदिलवर गुन्हा दाखल करण्यात आला. आदिल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. अशा प्रकारे राखीचं आयुष्य नेहमीच लाइमलाईट राहिलं आहे. आता तिच्या अशाच वादग्रस्त आयुष्यावर चक्क सिनेमा येणार आहे. Swini Khara: बिग बींच्या ‘चीनी कम’ फेम बालकलाकाराने बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा; लवकरच बांधणार लग्नगाठ राखीच्या भावाने तिच्यावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. ई-टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचा भाऊ तिच्या आयुष्यावर चित्रपट बनवणार आहे. ज्याचं टायटल असेल ‘राउडी राखी’. या सिनेमात राखी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. राखी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून मुख्य अभिनेत्री देखील तीच असणार आहे. मीडिया पोर्टलशी बोलताना राखीने स्वतः याबाबत माहिती दिली. ती म्हणाली, “होय, मी हा चित्रपट करतेय.” या शीर्षकाबद्दल बोलताना तिचा भाऊ राकेश सावंत म्हणाला की, ‘राखी एक राउडी आहे जी तिच्या मार्गात अडथळे निर्माण करणाऱ्या कोणालाही सोडत नाही. राखीने तिच्या पती आदिललादेखील ‘चांगलाच धडा शिकवला आहे".

News18लोकमत
News18लोकमत

राखी सावंत सध्या तिचा पती आदिल दुर्रानीसोबतच्या प्रकरणामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने त्याच्यावर अनेक आरोप केल्यानंतर आणि त्याच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर त्याला 7 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले होते. अभिनेत्रीने तिच्या पतीवर पैसे आणि दागिने हिसकावून, फसवणूक आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. आदिल सध्या म्हैसूर तुरुंगात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात