तुम्ही अमिताभ बच्चन यांचा 'चीनी कम' चित्रपट पाहिला आहे का? जर होय, तर अमिताभ बच्चन यांची शेजारी बनलेली ती लहान मुलगी तुम्हाला आठवत असेल. स्विनी खरा असे या मुलीचे नाव असून ती आता मोठी झाली आहे.
स्विनी खराने नुकतीच बॉयफ्रेंडसोबत एंगेजमेंट केली आहे. तिने नुकतेच एंगेजमेंटचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
स्विनी खराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एंगेजमेंटचे फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
स्विनी खरा हिला बालकलाकार म्हणून खूप प्रसिद्धी मिळाली. स्विनीने 'परिणीता' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
स्विनी खरा शेवटची 2016 मध्ये आलेल्या 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटात दिसली होती. आपल्या 11 वर्षांच्या कारकिर्दीत स्विनी खाराने 11 चित्रपट आणि 4 टीव्ही शो केले.