मुंबई, 23 फेब्रुवारी: राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान यांचं नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे. राखी सावंतने पती आदिल खानवर मारहाण, शोषण आणि पैशांची अफरातफर केल्याचे गंभीर आरोप केले. राखीच्या तक्रारीनंतर आदिलवर गुन्हा दाखल करण्यात आला. आदिल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याचवेळी म्हैसूरमध्ये एका इराणी तरुणीने आदिलवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. नुकतीच राखी सावंत त्या मुलीला आधार देण्यासाठी शर्लिन चोप्रासोबत म्हैसूरला पोहोचली तेव्हा ती तिच्या सासरच्या घरी गेली. पण राखी सावंतला सासरच्यांनी कशी वागणूक दिली त्याविषयी राखीने खुलासा केला आहे. राखी सावंतने आदिल खान दुर्राणीवर केवळ मारहाण आणि शोषणाचा आरोप केला नाही तर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप देखील केला होता. राखीने असा दावाही केला की, जेव्हा ती आदिलला भेटायला कोर्टात गेली होती तेव्हा त्याने तिला धमकी दिली होती. बलात्कार प्रकरणात आदिलला म्हैसूर न्यायालयातही हजर केले जाऊ शकते. पण त्याआधी राखी नुकतीच सासरी म्हैसूरला गेली होती. Mrs Chatterjee Vs Norway Trailer: काळजाला भिडणारी आईच्या संघर्षाची कथा; राणी मुखर्जीचा अभिनय आणतोय अंगावर शहारा राखी सावंत नुकतीच म्हैसूरला पोहोचली तेव्हा तिच्या सासरच्या लोकांनी तिला चांगली वागणूक दिली नाही. प्रसारमाध्यमांशी बोलताना राखी आईचं नाव घेत ढसाढसा रडू लागली. तसेच यावेळी तिने आदिलच्या कुटुंबियांबाबत वक्तव्य केलं. राखी म्हणाली, ‘मला न्याय हवा आहे. मी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. मी आदिलबरोबर लग्न केलं. लग्न केलं असल्याचे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत.’ ती पुढे म्हणाली कि, ‘पण आता आदिलचे कुटुंबीय मला म्हणत आहेत की, तू हिंदू आहेस म्हणून आम्ही तुझा स्वीकार करू शकत नाही. असं जर माझ्याबरोबर घडत असेल तर मी कुठे जाऊ? मी आता काय करू? तो मला खूप त्रास देत आहे. सध्या माझी प्रकृतीही ठिक नाही. असं म्हणत राखी रडू लागली.
Bollywood actress #RakhiSawant breaks down in #MysuruCourt Premises.. She & her friend #SherlynChopra had come to support the #IranianGirl who has filed rape case against #AdilKhanDurrani, husband of Rakhi. Rakhi said family of Adil, is not accepting her, where should she go now. pic.twitter.com/qcp5KL6iuv
— Hate Detector 🔍 (@HateDetectors) February 22, 2023
काही दिवसांपूर्वी राखीने एक व्हिडिओ शेअर करून सासू-सासऱ्यांवरही आरोप केले होते. राखीने सांगितले होते की, तिने कोर्ट मॅरेजची सर्व कागदपत्रे आदिलला तिच्या सासरच्या मंडळींना दाखवली होती. राखीचे आदिलसोबत लग्न झाल्याचे त्यांना आधीच माहीत होते. असे असूनही त्यांनी आदिलचे दुसऱ्याशी लग्न लावून दिले. राखीने सांगितले होते की, जेव्हाही ती सासू आणि सासरे यांना फोन करते तेव्हा ते फोन डिस्कनेक्ट करतात.
राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांच्यात काही महिन्यांपूर्वीपर्यंत सर्व काही ठीक चालले होते. सार्वजनिक ठिकाणीही दोघांनी एकमेकांबद्दल प्रेमाची कबुली दिली होती. पण त्यानंतर राखी सावंतने तिचे आणि आदिलचे लग्न झाले आहे, पण आदिलच्या सांगण्यावरून तिला लग्न लपवण्यास भाग पाडले गेले असा खुलासा केला. काही दिवसांनंतर राखी सावंतने आदिलचे विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा करून सर्वांना धक्का दिला. आदिलच्या फोनमधील चॅट्स तिने वाचल्या आहेत आणि तिच्याकडे या दोघांविरुद्ध पुरावेही आहेत, असेही राखीने म्हटले आहे. यानंतर राखीने आदिलविरुद्ध पैशांची उधळपट्टी, मारहाण आणि फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून कारवाई करत पोलिसांनी आदिल खान दुर्राणीला त्याच्या घरातून ताब्यात घेतले होते.