मुंबई,02 फेब्रुवारी: बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) याचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांमध्ये ऋतिक याचे नाव घेतलं जातं. 2019 मध्ये त्याचे ‘वॉर’ आणि ‘सुपर 30’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच हिट ठरले होते. 2000 मध्ये आलेल्या कहो ना प्यार है (Kaho Naa Pyaar Hai) या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. यामध्ये आमिषा पटेल आणि ऋतिक रोशन यांच्या जोडीला खूपच पसंती मिळाली होती. परंतु या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर ऋतिकने स्वत:ला एका खोलीत बंद करुन घेतले होते आणि त्यावेळी तो खूप ढसाढसा रडला होता. याविषयी त्याचे वडील आणि दिग्दर्शक राकेश रोशन(Rakesh Roshan) यांनी एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर त्याने खरंतर आनंदी व्हायला हवं होतं. पण तो एका खोलीत स्वतःला बंद करून रडत बसला होता. त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश करून चूक केली की काय असे त्याला वाटत होते. यावर त्यांनी याचं कारण जेव्हा हृतिकला विचारलं तेव्हा त्याने सांगितले की, ‘दिवसभरात खूप लोक भेटायला येतात. त्या सगळ्यांना मला भेटायचं आहे. माझ्याशी बोलायचं आहे. याचा मला प्रचंड त्रास होतो. या सगळ्या गोष्टींमुळे मी कामावर लक्ष केंद्रीत करू शकत नाही.’ तेव्हा मी त्याची समजूत काढत त्याला त्याच्या कामावर लक्ष द्यायला सांगितलं. तेव्हापासून हृतिकने आजपर्यंत कधीही कसल्याही प्रकारची तक्रार केली नसल्याचे राकेश रोशन यांनी सांगितलं.
हे देखील वाचा - मिस्टर परफेक्शनिस्टचा Mobile आता Switch off; ‘या’ कारणामुळे घेतला मोठा निर्णय
राकेश रोशन म्हणाले, यावेळी मी त्याला कोणत्याही नवीन बदलाला ओझ्याप्रमाणे न घेता जबाबदारी म्हणून स्वीकारलंस तर तू नक्की यशस्वी होशील असं सांगितलं होतं. तेव्हापासून त्याने सर्व जबाबदारी व्यवस्थित पार पाडल्याचंही राकेश रोशन यावेळी म्हणाले. दरम्यान, ऋतिक रोशनचा (Hrithik Roshan) 2019 मध्ये ‘वॉर’ आणि ‘सुपर 30 हे 2 चित्रपट आले होते. सध्या तो क्रिश-4(Krissh-4) या त्याच्या आगामी चित्रपटावर काम करत आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. hindi.news18.com/news/entertainment/bollywood-when-hrithik-roshan-cried-in-his-room-saying-i-cant-work-ps-3442048.html