मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मिस्टर परफेक्शनिस्टचा Mobile आता Switch off; 'या' कारणामुळे घेतला मोठा निर्णय

मिस्टर परफेक्शनिस्टचा Mobile आता Switch off; 'या' कारणामुळे घेतला मोठा निर्णय

आपल्यासारखा सर्वसामान्य व्यक्तीही मोबाईलशिवाय राहू शकत नाही तर मग सुपरस्टार असलेला अभिनेता आमिर खाननं (Aamir Khan) नेमका हा निर्णय का घेतला ते वाचा.

आपल्यासारखा सर्वसामान्य व्यक्तीही मोबाईलशिवाय राहू शकत नाही तर मग सुपरस्टार असलेला अभिनेता आमिर खाननं (Aamir Khan) नेमका हा निर्णय का घेतला ते वाचा.

आपल्यासारखा सर्वसामान्य व्यक्तीही मोबाईलशिवाय राहू शकत नाही तर मग सुपरस्टार असलेला अभिनेता आमिर खाननं (Aamir Khan) नेमका हा निर्णय का घेतला ते वाचा.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 01 फेब्रुवारी : मोबाईल (mobile) म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत आपण मोबाईलवरच असतो. अगदी काही वेळ मोबाईलपासून दूर राहायचं म्हटलं तरी अनेकांना ते शक्य होत नाही. खरंतर मोबाईलशिवाय आयुष्यच अर्धवट आहे, असंच कित्येकांना वाटतं. पण अभिनेता आमिर खाननं (Aamir Khan) मोबाईल फोन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर खाननं मोबाईलपासून दूर राहायचं ठरवलं आहे. लाल सिंह चड्ढा  (Lal Singh Chaddha)' रिलीज होईपर्यंत मोबाइल वापरणार नाही असं आमिरनं सांगितलं आहे. अभिनेत्याच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार आमिर खाननं लाल सिंह चड्ढाच्या शूटिंगमध्ये काही कालावधीसाठी ब्रेक घेतला होता आता पुन्हा त्यानं या फिल्मचं शूटिंग सुरू केलं आहे. या वर्षात ख्रिसमसला ही फिल्म रिलीज होणार आहे.आमिरला आपल्याला मोबाईल फोनचं व्यसन जडल्यासारखं वाटतं आहे.  कामात आणि वैयक्तिक आयुष्यातही मोबाईल फोन अडचणीचा ठरतो आहे, त्याचे दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे लाल सिंह चड्ढा रिलीज होईपर्यंत आमिर मोबाईल बंद ठेवणार नाही. जे काही महत्त्वाचे फोन असतील ते त्याच्या मॅनेजरमार्फत त्याला समजतील. त्याचं सोशल मीडियादेखील त्याची टीमच हाताळणार आहे. आमिर खानला तसंही परफेक्टनिशस्ट म्हणतात आणि मोबाईलपासून दूर राहण्याचा परफेक्ट निर्णय घेऊन त्यानं हे पुन्हा सिद्ध केलं आहे हे वाचा - दीपिका पादुकोणच्या फोटोचा सोशल मीडियावर व्हायरल; Good News चा दिला संकेत...? .'लाल सिंह चढ्ढा' हा सिनेमा 'फॉरेस्ट ग्रम्प' या हॉलिवूड सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अद्वैत चंदननं केलं आहे. अद्वैतनं याआधी 'सीक्रेट सुपरस्टार' या आमिरच्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. आमिरच्या या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत कारण, मागील वर्षा आलेला त्याचा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' बॉक्स ऑफिसवर आपली छाप पाडू शकला नव्हता. तसेच या सिनेमावर समीक्षक आणि प्रेक्षकांनी टीकाही केली होती. हे वाचा - Virat Anushka ट्रिपला जाण्याचा प्लॅन करतानाचा VIDEO VIRAL; जाहिरातीत दिसले एकत्र या सिनेमात आमिरसोबत अभिनेत्री करिना कपूर खान दिसणार आहे. याशिवाय 3 इडियट्स सिनेमातील अभिनेत्री मोना सिंह सुद्धा या सिनेमात दिसणार आहे.
First published:

Tags: Aamir khan

पुढील बातम्या