मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Raju Srivastav Heart Attack: जिममध्ये वर्कआउट करताना प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तवला हृदयविकाराचा झटका

Raju Srivastav Heart Attack: जिममध्ये वर्कआउट करताना प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तवला हृदयविकाराचा झटका

दिवसेंदिवस कलाकारांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढत आहे.

दिवसेंदिवस कलाकारांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढत आहे.

दिवसेंदिवस कलाकारांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढत आहे.

    मुंबई, 10 ऑगस्ट- दिवसेंदिवस कलाकारांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढत आहे. प्रसिद्ध कॉमेडियन आणि उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं समोर आलं आहे. त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वर्कआउटच्या मध्यंतरी ते ट्रेडमिलवरुन खाली कोसळल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. त्याठिकाणी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं समोर आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आज सकाळी वर्कआउटदरम्यान ही घटना घडली. राजू श्रीवास्तव वर्कआउट करत होते. परंतु अचानक ते ट्रेडमिलवरुन खाली पडले. त्यांनतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना 48 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं जाणार आहे. त्यांनतर त्यांना रुग्णलयातून घरी सोडण्यात येईल असंही सांगण्यात येत आहे. सध्या तरुणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढत असल्याचं समोर आलं आहे. अनेक सेलिब्रेटीमध्ये ही समस्या दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी लोकप्रिय कॉमेडियन सुनील ग्रोव्हर अर्थातच गुथीलासुद्धा हृदयविकाराचा झटका आला होता. त्यालासुद्धा तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. योग्य त्या उपचारानंतर आणि प्रकृतीत सुधारणा झाल्यांनतर सुनीलला घरी पाठवण्यात आलं होतं. आता त्याची तब्ब्येत अगदी उत्तम आहे. आणि त्याने आपल्या कामालाही सुरुवात केली आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Comedian, Entertainment

    पुढील बातम्या