मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Valentine Day - राजकुमार रावचं गर्लफ्रेंडला लिहिलेलं लव्हलेटर VIRAL

Valentine Day - राजकुमार रावचं गर्लफ्रेंडला लिहिलेलं लव्हलेटर VIRAL

अभिनेता राजकुमार रावने त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखाला दोन पानांचं लव्हलेटर लिहिलं आहे. या लव्हलेटरने त्यानं गर्लफ्रेंडचं मन तर जिंकलं आहेच शिवाय चाहत्यांचीही मनं जिंकली आहेत.

  • Published by:  Manoj Khandekar

मुंबई, 13 फेब्रुवारी - व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) आता फक्त एका दिवसावर येऊन ठेपलाय. अशातचं सर्व प्रेमी युगुलं आपल्या साथीदाराला सरप्राईज देण्याच्या तयारीत आहेत. आपल्या वॅलेंटाईव डे ला खास बनवण्यासाठी बॉलिवूडचे सुपरस्टारही आता सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव झालेत. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) यानं आपली गलफ्रेंड पत्रलेखाला इंस्टाग्रामवर दोन पानांचं लव्हलेटर लिहिलंय. हे लव्हलेटर Instagram वर पोस्ट केल्यानंतर ते लगेच व्हायरल झालं. त्याच्या या लेटरला एक लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत.

राजकुमार रावने असं केलं प्रेम व्यक्त -

'डियर पत्रलेखा,

हा प्रेमाचा महिना आहे आणि मी याच्या बाबतीतच विचार करत होतो. त्या शब्द आणि इशाऱ्यांबाबत मी विचार करत होतो ज्याद्वारे आपण आपलं प्रेम व्यक्त करतो. मी अनेक रोमॅंटीक आणि चांगले रोल्स केल्यानंतरही माझ्या मनात प्रेमाचा स्विकार करण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. असं बरंच काही लिहित राजकुमार रावने पुढे म्हलंय की, किती तरी वेळा असं होतं की प्रेमात वेडा होणं आणि प्रेमात आंधळं होणं असे शब्द आपण वापरून जातो कारण आपल्या भावना आपल्या प्रिय व्यक्तीला कळाव्यात म्हणून कधी कुणी याचा विचार केला असेल का की याचा अर्थ काय आहे? खरंच प्रेम हे आहे की याचा काही तर्क नाही.

त्याच्या या दोन पानांच्या लव्हलेटरने त्याच्या गर्लफ्रेंडसोबतच त्याच्या चाहत्यांचंही मन जिंकलं आहे. काही चाहत्यांनी तर त्यावर कमेंटही केल्या आहेत. एकानं तर

लिहिलं आहे की, हे खूपच प्रेमळ लव्हलेटर आहे. तर दुसऱ्यानं लिहिलंय की, या थंडीच्या दिवसांमध्ये गरम गरम कॉफीसारखं आहे हे लव्ह लेटर.

सोशल मीडियावर राजकुमार रावचा हा प्रेम व्यक्त करण्याचा त्याचा हा अंदाज सगळ्यांच्याच पसंतीला अतरला आहे.

'व्हॅलेंटाइन डे' : रतन टाटांनी सांगितली त्यांची लव्ह स्टोरी, चीनमुळे तुटलं नातं

Valentines Day 2020 : पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही हवा असतो सेक्स मात्र...

Valentines Day ला डेटिंगवर जाताय, 'या' गोष्टी टाळा नाहीतर घोळ होईल

First published:

Tags: Entertenment, Rajkummar rao, Valentine day