जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / 'Valentine's Day' च्या निमित्ताने रतन टाटांनी सांगितली त्यांची लव्ह स्टोरी, चीनमुळे तुटलं नातं...

'Valentine's Day' च्या निमित्ताने रतन टाटांनी सांगितली त्यांची लव्ह स्टोरी, चीनमुळे तुटलं नातं...

ratan tata

ratan tata

त्या दिवसांच्या आठवणीत रमताना रतन टाटा सांगतात, हवा खूपच छान होती, माझ्याकडे गाडी होती… याच दिवसांत मी एका मुलीच्या प्रेमात पडलो…

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : भारतातले बडे उद्योगपती आणि टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा (Ratan Tata) यांनी व्हॅलेंटाइन डे (Valentine Day)च्या एक दिवस आधी सोशल मीडियावर त्यांची लव्ह स्टोरी शेअर केली आहे. ग्रॅज्युएशननंतर लॉस एंजेलिसमध्ये काम करत असताना त्यांचं लग्न जवळजवळ ठरलंच होतं… रतन टाटा यांनी त्यांचं आयुष्य, आईवडिलांचा घटस्फोट, बहिणीच्या सहवासात घालवलेले दिवस, मिळालेले संस्कार, कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण, प्रेम आणि अगदी हे नातं का तुटलं … हे सगळं ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ (Facebook Page Humans of Bombay)या फेसबुक पेजशी शेअर केलं. रतन टाटांची लव्ह स्टोरी रतन टाटांनी आर्किटेक्चरमध्ये ग्रॅज्युएशन केलं होतं. त्यामुळे त्यांचे वडील त्यांच्यावर नाराज होते. रतन टाटा लॉस एंजेलिसमध्ये नोकरी करत होते. तिथे त्यांनी दोन वर्ष काम केलं. त्या दिवसांच्या आठवणीत रमताना ते सांगतात, हवा खूपच छान होती, माझ्याकडे गाडी होती आणि माझं माझ्या नोकरीवरही खूप प्रेम होतं…याच दिवसांत मी एका मुलीच्या प्रेमात पडलो… रतन टाटा तिच्याशी लग्नही करणार होते पण त्याचवेळी त्यांच्या मोठ्या बहिणीची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे त्यांना भारतात यावं लागलं. आठवणीत रमले रतन टाटा ज्या मुलीच्या प्रेमात ते पडले होते ती आपल्यासोबत भारतात येईल, असं रतन टाटांना वाटलं होतं पण त्याचवेळी भारत - चीनचं युद्ध सुरू झालं आणि त्यामुळेच त्या मुलीचे आईबाबा तिला भारतात पाठवायला तयार नव्हते… त्यानंतर हे नातं तुटलं…. आपल्याला माहितीय की रतन टाटा अविवाहित आहेत आणि टाटा ग्रुप हाच त्यांचा परिवार आहे.आपल्या बालपणाबदद्ल ते म्हणतात, माझं बालपण छान होतं पण आईवडिलांच्या घटस्फोटामुळे मला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. याच दिवसांत त्यांना त्यांच्या आजीने सांभाळलं. माझी आजी उन्हाळ्याच्या सुटीत मला लंडनला घेऊन गेली होती, हेही ते सांगतात. आजीनेच माझ्यावर जीवनाच्या मूल्यांचे संस्कार केले, हे त्यांनी आवर्जून सांगितलं. ===========================================================================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात